कोल्हापूर- आज दुपारी प्राप्त झालेल्या 134 अहवालांपैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्रीपासून आणखी 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 3 जण चंदगडमधील, शाहूवाडीतील 1 आणि आजरामधील 1 अशा 5 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजअखेर 725 रुग्णांपैकी 644 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 73 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात एकूण 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांच्या संख्या पुढील प्रमाणे आहे
आजरा- 75, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 717 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 725 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.