कोल्हापूर - पुण्याहून आलेल्या भक्तीपूजा नगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज रात्री उशिरा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. त्या कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाशाला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. यामध्ये त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील इतर चारही सदस्यांसह इतर 31 जणांना स्वतंत्ररित्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
पुढील १४ दिवस विलगीकरणात राहून निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे