मुरगूड - कोल्हापुरात गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना घडली आहे. येथीळ एका शिक्षकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अर्जुनवाडा तालुका कागल येथील एका महाविद्यालयीन युवतीने सहा दिवसांपूर्वी विष प्राशन ( Girl Commits Suicide Kagal ) केले होते. उपचार सुरु असताना या युवतीचा काल, शुक्रवारी मृत्यू ( young woman commits suicide in kolhapur ) झाला. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. तर दुसरी घटना शाहूवाडी तालुक्यातही कांडवनमध्ये येथे घडली आहे. येथील तरूणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
- सोशल मीडियावरून देत होता त्रास -
अधिक माहिती अशी की, अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी ता.कागल येथील एका शाळेमध्ये अमित कुंभार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो तरूणीला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी त्रास देत होता. गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिलासा तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन हा आणि असेच संदेश तो पाठवत होता.
- उपचारादरम्यान मृत्यू -
त्याच्या या वारंवार त्रासाला कंटाळून तरूणीने २२ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.
- प्रियकराच्या त्रासाला कंटाळून शाहूवाडी एका युवतीची आत्महत्या -
कोल्हापूरातल्या शाहूवाडी तालुक्यातील कांडवनमध्ये सुद्धा एका प्रियकराच्या त्रासाला कंटाळून 21 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील अमोल संजय सुतार या तरुणाचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. मात्र ही बाब घरात समजल्यावर मुलीच्या घरच्यांनी त्या दोघांचे बोलणे बंद केले होते. त्यानंतर सुद्धा संबंधित तरुण मुलीला लग्न कर असे म्हणत वारंवार त्रास देत होता. त्याच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. शाहूवाडी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - MP Bhind Boat Drowned : भंडारा खाऊन परताना सिंध नदीत बोट बुडाली; 2 चिमुकले बेपत्ता, बोटीत होते 12 जण