कोल्हापूर - राज्यासह देशात कोरोना संसर्ग कमी करण्यामध्ये लसीकरणाच्या महत्वाचा वाटा आहे. कोरोना सारख्या न दिसणाऱ्या शत्रूला सामोरे जात असताना गेली 2 वर्षेहून अधिक काळ लोक नेहमी लॉकडाऊन आणि निर्बंधाना सामोरे जाव लागत असताना गेल्या वर्षात लासीकरणास सुरुवात करण्यात आले. मात्र यातून 18 वर्षाखालील लहान मुलांना वगळण्यात आले होते. तर गेल्या काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली आणि 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष लासीकरणासाठी सुरुवात करण्यात झाले. राज्यासह कोल्हापुरात देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. तर कोल्हापूर महापालिकेने लसीकरणतील आपली अव्वलता कायम राखली आहे. महापालिकेने अवघ्या काही दिवसातच शहरातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांतील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण शंभर टक्के पूर्ण केले आहे.
133 शाळा महाविद्यालयात जाऊन लसीकरण -
राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणाला 3 जानेवारी पासून सुरुवात झाले. मात्र राज्यात अनेक शहरात नागरिकांनी आपल्या मुलांना लस देण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. याला कारण म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये लस घेण्याबाबत जनजागृती केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या उलट कोल्हापुरात घडल आहे. होय कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे कोल्हापूर महापालिकेने अवघ्या काही दिवसातच पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे 100% लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला आहे.कोल्हापूर शहरात एकूण 133 शाळा व महाविद्यालय यांच्याशी चर्चा करून व पालकांमध्ये जनजागृती केले. तसेच रोज 11 महाविद्यालयमध्ये जाऊन प्रत्येकी 500 म्हणजे रोज पाच ते साडेपाच हजार विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करून घेऊन विद्यार्थ्यांना तेथेच लसीकरण केल्याने इतक्या जलद रित्या लसीकरण पूर्ण झाले आहे. अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे.
58 ते 18 वयोगटातील 100% लसीकरण पूर्ण -
कोल्हापूर शहरात पहिला डोस साठी एकूण 28 हजार 896 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या वतीने एकूण 29 हजार 964 विद्यार्थ्यांचे पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण केले आहे. याची टक्केवारी काढले असता 104% लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील स्थानिक विद्यार्थ्यानसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यानमुळे आणखी काही प्रमाणात लसीकरणाची संख्या वाढणार आहे.यामुळे पुढील अजून एक आठवडा प्रत्येक महाविद्यालयात जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणार असल्याचे उपयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे.
प्रिकॉशन डोस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद -
ओमायक्रोनच्या या तिसऱ्या लाटेमध्ये लढण्यासाठी हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर महत्वाची भूमिका आहे. यांना थेट बाधित रुग्णाच्या जवळ जाऊन उपचार करावे लागतात म्हणून यांना देखील 10 जानेवारी पासून प्रिकॉशन डोस देणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ज्यांचा दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना शहरातील 11 सेंटरच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गुरुवार पर्यंत प्रिकॉशन डोसमध्ये हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधिग्रस्त 4260 नागरिकांना हा प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर 1653, फ्रंट लाईन वर्कर 1091 व 60 वर्षावरील 1516 व्याधिग्रस्त नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन -
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हे महत्वाच आहे. मात्र अद्याप देखील काही नागरिकांनी लसीचा दुसरा डोस न घेतल्याने त्यांना ओमायक्रोन चा धोका अधिक असू शकतो यामुळे ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी आपल्या जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीचे डोस घ्यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.