ETV Bharat / state

पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण; आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

जालन्यातील एका तरुणाने आपले ध्येय्य पूर्ण करण्यासाठी शाळा सोडली. त्यानंतर जिद्दीने त्याने गणेश मूर्ती तयार करण्याची कला अवगत केली. त्यामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी देखील साथ दिली. त्यामुळे आता तो स्वतःचा गणेश मूर्तींचा कारखाना उभारणार आहे.

author img

By

Published : Aug 26, 2019, 12:47 PM IST

पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण, आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

जालना - शहरातील हिंदी विद्यालयात इयत्ता पाचवीचे धडे घेताना 'त्याने' गणेश मूर्ती बनवण्याचा धडा गिरवला. त्यावेळी याच क्षेत्रात भविष्य घडवण्याचे ठरवले आणि तो कामाला देखील लागला. आज त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. यंदा तो तब्बल अडीच हजार मूर्ती विकणार आहे. तसेच लवकरच गणेश मूर्तींचा कारखाना उभारणार आहे.

पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण, आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

उमेश अशोक कापसे, असे या २० वर्षीय मूर्तीकाराचे नाव आहे. तो शहरातील कुंभारवाडा भागात राहतो. त्याने आपले ध्येय गाठण्यासाठी 2007 नंतर शाळा सोडली. त्यानंतर चांगल्या मूर्ती कशा तयार करायच्या यासाठी अनेक ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन घेतले. त्यामधून घरीच मातीपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र, त्यामध्ये रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे मधुकर गायकवाड आणि रामदास कुलकर्णी या दोन शिक्षकांनी त्याला आर्थिक बाजूसह व्यवसाय मिळवून देण्यासाठी मदत केली. या मदतीच्या जोरावर तो आता गणपती तयार करण्याचा कारखाना सुरू करणार आहे. त्यासाठी त्याने घरातील सर्वांनाच कामे विभागून दिली आहेत. त्याचा मोठा भाऊ लखन हा तयार केलेल्या गणेश मूर्तीवर कोरीव काम करतो. त्याची बहीण संजना ही गणपतीला टिळा आणि डोळे काढण्याचे काम करते. त्याचे वडील अशोकराव हे शाडू माती मळण्याचे काम करतात. वहिनी अंजना ही गणपतीच्या पाट्याला रंग देण्याचे काम करते. आई सीताबाई या गणपतीला पांढरा रंग देण्यासह उर्वरित कामे करण्यात त्याला मदत करतात.

उमेशने गेल्यावर्षी 2 हजार गणपती विकल्यानंतर यंदा अडीच हजार गणपती विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून होणाऱ्या दुष्परिणाम होतात. त्यामुळे तो सर्व गणपती शाडूच्या मातीने तयार करतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विरघळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. मात्र, शाडूच्या गणेशमूर्ती फक्त अर्ध्या तासातच विरघळतात. त्यामुळे तो पर्यावरणाला पूरक अशा मूर्ती तयार करतो. यावर्षीच्या गणपतीमध्ये गणेश मंडळांनी सुचवलेल्या संकल्पनेनुसार हेल्थ क्लबसाठी बिल्डर गणपती, तालीम संघासाठी बजरंग बली गणपती, तर चोरून मोदक खाणाऱ्या उंदिराची तक्रार करतानाची मूर्ती अशा विविध संकल्पना मांडून २ ते ३ फुटांपर्यंत गणपती तयार करण्यात आले आहेत.

'अशी' तयार करतात गणेश मूर्ती -

अहमदनगर जिल्ह्यातून ४० किलो शाडू मातीची एक गोणी ५०० रुपयाला विकत घेतली जाते. त्यानंतर ही माती भिजून मळली जाते. साच्यामध्ये टाकून लहान गणेश मूर्ती तयार केली जाते. एक गणेश मूर्ती साधारण १० मिनिटात तयार होतो. त्यानंतर मूर्ती सात ते आठ दिवस वाळवण्यासाठी ठेवली जाते. त्यानंतर मूर्तीला रंगरंगोटी करून तिला आकर्षक रूप दिले जाते. मोठ्या मूर्तींसाठी साचा वापरता येत नाही. त्यामुळे त्या सर्व हातानेच तयार करावे लागतात. त्यासाठी बराचसा वेळ खर्च होतो. मात्र, यामधून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यामुळेच उमेशने आता याच क्षेत्रात भविष्य घडविण्याचे ठरविले आहे.

Intro:शहरातील नाथांनी हिंदी विद्यालयात पाचवीचे धडे गिरवत असताना मातीचा गणपती बनवण्याचा ही धडा त्याने गिरवला. आणि तो गिरवत असतानाच त्याने याच क्षेत्रात आपल्याला भविष्य घडवायचे आहे हा ध्यास घेऊन तो कामाला लागला. पाहता पाहता आज त्याचे हे स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. मात्र वाटेत येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करताना ही त्याची दमछाक होत आहे. परंतु घरातील सर्वांच्याच मदतीने तो ही जिद्द पूर्ण करत असून या गणपती महोत्सवात अडीच हजार गणपती विकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. शहरातील कुंभारवाडा परिसरात असलेला वीस वर्षीय उमेश अशोकराव कापसे हा तो तरुण.

Body:2007 नंतर शाळा सोडून आपले ध्येय गाठण्यासाठी रस्ता शोधत असलेला हा तरुण अनेक ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन घेत फिरला, त्यानंतर घरीच मातीपासून मूर्ती तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले .मात्र त्यामध्ये रेखीवपणा पुरेसा येत नव्हता, म्हणून मधुकर गायकवाड आणि रामदास कुलकर्णी या दोन शिक्षकांनी त्याला आर्थिक बाजू सह व्यवसाय मिळवून देण्यासाठी ही मदत केली .या मदतीच्या जोरावर तो आता गणपती बनविण्याचा कारखाना सुरू करणार आहे .त्यासाठी त्याने घरातील सर्वांनाच कामे विभागून दिले आहेत. त्याचा मोठा भाऊ लखन हा तयार केलेल्या गणेशमूर्ती वर कोरीव काम करतो त्याची बहीण संजना ही गणपतीला गंध आणि डोळे काढण्याचे काम करते .त्याचे वडील अशोकराव हे शाडू माती मळून देण्याचे काम करतात ,वहिनी अंजना ही गणपतीच्या पाट्याला रंग देण्याचे काम करते .आई सीताबाई ह्या गणपतीला पांढरा रंग देण्यासह उर्वरित इतर कामे करण्यात त्याला मदत करतात. मागील वर्षी 2000 गणपती विकल्यानंतर या वर्षी त्याने अडीच हजार गणपती विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्लास्टर ऑफ पेरिस पासून होणाऱ्या दुष्परिणामामुळे हे सर्व गणपती शाडूच्या मातीमध्ये तो तयार करतो जेणेकरून गणपती विसर्जन झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच गणेश मुर्ती पाण्यामध्ये विरघळून जाईल. जिथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विरघळण्यासाठी एक ते दीड महिना लागतो तिथे फक्त अर्ध्यातासातच ही मूर्ती विरघळते. त्यामुळे पर्यावरणाला पूरक असे हे गणपती आहेत. यावर्षीच्या गणपतीमध्ये गणेश मंडळांनी सुचविलेल्या संकल्पनेनुसार हेल्थ क्लब साठी बिल्डर गणपती ,तालीम संघासाठी बजरंग बली गणपती ,तर लहान मुलांसाठी चोरून मोदक खाणाऱ्या उंदराची दुसरा उंदीर करीत असलेले तक्रारीचा गणपती,आशा विविध संकल्पना मांडूळ दोन ते तीन फुटापर्यंत गणपती तयार करण्यात आले आहेत .
****.असा आहे गणपती चा प्रवास ***
नगर जिल्ह्यातून चाळीस किलो शाडू मातीची ची एक गोणी पाचशे रुपयाला विकत घ्यावी लागते. त्यानंतर ही माती भिजून मळावी लागते ,आणि लहान गणपतीसाठी असलेल्या साच्यामध्ये ती टाकून गणपती तयार करावा लागतो .एक गणपती चार ते पाच मिनिटात तयार होतो परंतु उर्वरित हात जोडण्याचे काम पुढील पाच मिनिटात करावे लागते. असा दहा मिनिटात तयार झालेला गणपती सात ते आठ दिवस वाळवण्यासाठी ठेवावा लागतो. त्यानंतर त्याला पांढऱ्या रंगात बुडविला जाते .आणि मग तिथून सुरू होतो तो त्याचा नट्टापट्टा, मेकअप, आणि या मेकअप च काम आहे घरातील महिला मंडळांकडे .उमेश ची आई ,भावजय आणि बहीण या तिघीही ही गणपतीच्या मेकअप करण्यावर भर देतात. असा सुमारे दहा दिवसांच्या प्रवासानंतर एक सुंदर आकर्षक गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणण्यासाठी तयार होते. साच्या व्यतिरिक्त देखील मोठ्या मूर्ती तयार करावे लागतात ,,त्या सर्व हातानेच तयार करावे लागतात. आणि त्यासाठी बराचसा वेळ खर्च करावा जातो.मिळालेल्या उत्पन्नातून सर्व घर चालते आणि यामुळेच आता याच क्षेत्रात भविष्य घडविण्याचे ही उमेशने ठरविले असून मिळालेल्या उत्पन्नावर तो समाधानी देखील आहे .आणि भविष्य घडविण्यासाठी त्याला घरच्यांनीही पाठिंबा दिलेलाआहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.