मुंबई Cricket Umpire : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. म्हणूनच भारतीय खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. पण जर तुम्ही क्रिकेटर बनण्यात अपयशी ठरलात आणि बेरोजगार झालात तर अंपायरिंगच्या माध्यमातून तुम्ही लाखो आणि करोडो रुपये कमावू शकता. एकप्रकारे भारतात सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा क्रिकेट अंपायर बनणं खूप सोपं आहे. यात तुमची कमाई कोणत्याही 'ए ग्रेड' सरकारी अधिकाऱ्यापेक्षा जास्त असेल.
करोडोंची होईल कमाई : भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर लोक खेळाला धर्म मानतात आणि त्याचे कार्यक्रम एखाद्या सणाप्रमाणे साजरे करतात. मात्र, या खेळाची मुळं इंग्लंडमध्ये आहेत. पण, भारत हा या खेळातील प्रमुख संघ बनला आहे. कारण भारत हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट टॅलेंटचा निर्माता आहे. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता आणि या खेळावरील लोकांचं प्रेम केवळ क्रिकेटपटूला प्रसिद्धच बनवत नाही तर त्याला जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू देखील बनवतं. कारण BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पण क्रिकेटर बनण्याव्यतिरिक्त या खेळात इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही भरपूर उत्पन्न मिळवू शकता. त्यापैकी एक अंपायर आहे. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये रस असेल आणि तुम्ही क्रिकेटपटू म्हणून तुमचं करियर बनवण्यात यशस्वी झाला नाही तर तुम्ही अंपायर बनण्याचा विचार करु शकता आणि जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालात तर तुम्ही लाखो आणि करोडो रुपये कमवू शकता.
ICC अंपायरचा पगार किती? : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंजूर केलेल्या सामन्यांमध्ये काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर्सना त्यांच्या देशात अंपायरिंग करणाऱ्यांपेक्षा जास्त पगार मिळतो. कारण सर्वोच्च स्तरावरील आयसीसी अंपायर प्रति वर्ष 66 लाख ते 1 कोटी 67 लाख रुपये कमवू शकतात, ज्यात सामना फी, रिटेनर फी आणि इतर भत्ते यांचा समावेश होतो. याशिवाय पंचांना प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पैसेही मिळू शकतात.
किती असतं अंपायरचं वेतन : एका कसोटी सामन्यातील आयसीसी अंपायरचं वेतन 3 लाख 33 हजार रुपये आणि एकदिवसीय सामन्यात 2 लाख 26 हजार रुपये आहे. तर T20 फॉरमॅटमध्ये एका सामन्यासाठी अंपायरचा पगार सुमारे 1 लाख 25 हजार रुपये आहे. तसंच हा पगार वैयक्तिक पंचाच्या अनुभवावर आणि सामन्याचं महत्त्व यावर अवलंबून असतो. पाकिस्तानचे अलीम दार हे ICC विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात महागडे अंपायर आहेत.
BCCI अंपायरला किती पगार देते : BCCI मध्ये अंपायर्ससाठी कोणतंही निश्चित वेतन नाही. परंतु, BCCI अंपायर्सना त्यांचं वय, प्रमाणपत्र आणि अनुभव इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागते. अहवालानुसार, A+ आणि A श्रेणीतील अंपायर्सना दररोज 40,000 रुपये आणि श्रेणी B आणि C श्रेणीतील अंपायर्सना देशांतर्गत सामन्यांसाठी प्रतिदिन 30,000 रुपये मानधन दिलं जातं. जर अंपायर म्हणून तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, तर तुम्हाला ICC अंपायर्सनाच्या एलिट पॅनेलमध्ये देखील समाविष्ट केलं जाऊ शकतं. ज्यांची प्रति मॅच फी यापेक्षाही जास्त आहे.
क्रिकेटमध्ये अंपायर्सचं महत्त्व : क्रिकेट हा खेळ दोन महत्त्वाच्या व्यक्ती चालवतात ज्यांना क्रिकेटच्या भाषेत अंपायर म्हणतात. मैदानावर आणि मैदानाबाहेर सामन्यादरम्यान निर्णय घेण्याची जबाबदारी क्रिकेट अंपायर्सवर सोपवली जाते आणि सामन्यातील पंचाचा निर्णय अंतिम असतो. खेळाच्या नियमांचं पालन करुन अंपायर्स मैदानावर न्याय्य खेळाची खात्री देतात आणि खेळाचा आत्मा राखला जाईल याचीही खात्री करतात. मैदानावरील अंपायर आणि मैदानाबाहेरील तिसरे अंपायर आहेत जे संघांनी आव्हान दिलेल्या निर्णयांचं पुनरावलोकन करतात. थर्ड अंपायर ग्राउंड अंपायर्सना दिलेले निर्णय देखील ठरवतात जे मैदानात पडताळले जाऊ शकत नाहीत. अंपायर्सचा निर्णय अंतिम असला तरी काही वेळा चुका होतात. नवीन नियमांमुळं क्षेत्ररक्षण कर्णधार आणि फलंदाज पंचांच्या निर्णयांना आव्हान देऊ शकतात.
क्रिकेट अंपायर होण्यासाठी पात्रता काय लागते : अंपायर होण्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळलंच पाहिजे असं नाही. पण तुम्हाला क्रिकेट आणि त्याच्या नियमांची पूर्ण माहिती असणं महत्त्वाचं आहे. याशिवाय, एखाद्या व्यक्तीकडे अंतर्ज्ञानी निर्णय घेण्याची क्षमता, उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे, कारण संपूर्ण सामन्यादरम्यान अंपायर उभा राहणं आवश्यक आहे. याशिवाय तुमची दृष्टीही चांगली असण गरजेचं आहे.
भारतात अंपायर कसं व्हायचं :
- स्टेप 1: राज्य क्रिकेट संघटनेचं सदस्य व्हा.
- स्टेप 2: स्टेट असोसिएशन प्रायोजकत्व मिळवा आणि अंपायर प्रमाणन कार्यक्रमासाठी BCCI अंपायर अकादमीमध्ये नावनोंदणी करा.
- स्टेप 3: BCCI अंपायर अकादमीनं घेतलेली अंपायर प्रमाणन परीक्षा उत्तीर्ण करा.
- स्टेप 4 : तुमच्या राज्य क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये सहभागी व्हा आणि अंपायरिंग प्रमाणपत्र मिळवा.
- स्टेप 5: राज्य स्तरावर अंपायरिंगचा दोन ते तीन वर्षांचा अनुभव मिळवा आणि नंतर BCCI लेव्हल 1 परीक्षेसाठी अर्ज करा आणि उत्तीर्ण करा.
- स्टेप 6 : BCCI मध्ये अंपायर होण्यासाठी, तुम्हाला BCCI द्वारे दरवर्षी घेण्यात येणारी लेव्हल 1 परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. या परीक्षेपूर्वी BCCI 3 दिवसांच्या कोचिंग क्लासचंही आयोजन करतं. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे परीक्षेअंतर्गत केली जाते. निवडलेल्या उमेदवारांना इंडक्शन कोर्स दिला जातो ज्यात त्यांना अंपायरिंगबद्दल शिकवलं जातं. त्यानंतर मुलाखत घेतली जाते. जे उत्तीर्ण होतात त्यांना लेव्हल 2 च्या परीक्षेला बसावं लागतं. त्यानंतर उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीनंतर ते BCCI मध्ये पंच बनतात.
- स्टेप 7: तुमचा अंपायरिंगमध्ये करिअर करण्याचा विचार असल्यास, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंगसाठी ICC कडून अंपायरिंग प्रमाणपत्रासाठी BCCI कडून शिफारस करण्याची विनंती करा.
भारतात क्रिकेट अंपायर प्रमाणपत्र : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL), रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, इराणी ट्रॉफी इत्यादीसारख्या देशांतर्गत आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अंपायरिंगसाठी क्रिकेट अंपायर्संना प्रमाणपत्रं देखील देतं.
भारतात अंपायर प्रशिक्षण कुठं होतं : बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असलेल्या BCCI अंपायर अकादमीद्वारे भारतात अंपायर प्रशिक्षण दिलं जातं. अकादमी राज्य क्रिकेट संस्थांद्वारे आयोजित पंचांना आवश्यक प्रशिक्षण प्रदान करते. अकादमी नियमित वेळापत्रकानुसार देशांतर्गत स्पर्धांमध्ये अध्यक्षीय अंपायर्ससाठी प्रमाणन परीक्षा देखील घेते. आंतरराष्ट्रीय अंपायर प्रमाणीकरणासाठी BCCI कडून ICC अंपायर अकादमीकडे देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्तम अंपायर्सची शिफारस केली जाते.
ICC मध्ये भारतीय अंपायर्स : नितीन मेनन, केएन अनंत पद्मनाभन, जयरामन मदनगोपाल, रोहन पंडित आणि वीरेंद्र शर्मा.
हेही वाचा :