ETV Bharat / technology

Kia Carnival आणि EV9 भारतात एकत्र लॉन्च - Kia Two Cars Launched in India - KIA TWO CARS LAUNCHED IN INDIA

Kia Carnival and Kia EV9 : किया कंपनीनं दोन कार Kia Carnival आणि EV9 एकत्र भारतात लॉन्च केल्या आहेत.

Kia EV9
किया EV9 (Kia)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 4, 2024, 3:29 PM IST

हैदराबाद Kia Carnival and Kia EV9 : कार निर्माता कंपनी किया इंडियानं भारतीय बाजारपेठेत आपल्या दोन कार एकाच वेळी लॉन्च केल्या आहेत. यापैकी पहिली Kia कार्निवल आहे, जी एक ICE कार आहे. दुसरी Kia EV9 एक इलेक्ट्रिक कार आहे. Kia Carnival एक प्रीमियम MPV आहे, तर Kia EV9 ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV आहे. चला तर मग, या दोन्ही कारची किंमत काय?, त्यात कोणते फिचर देण्यात आले आहेत, जाणून घेऊया...

Kia Carnival : Kia India नं नवीन-जनरेशन Kia Carnival MPV लाँच केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत 63.90 लाख (एक्स-शोरूम) आहे. लिमोझिन आणि लिमोझिन प्लस या दोन प्रकारांमध्ये ग्राहक हे मॉडेल बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी येत्या काही महिन्यांत सुरू होईल.

Kia Carnival
किया कार्निवल (Kia)

फिचर : यामध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात ड्युअल सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ, इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट पॅनेलसाठी ट्विन 12.3-इंचाचा डिस्प्ले, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड रिअर डोअर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरसह 360-डिग्री सराउंड कॅमेऱ्याच समावेश आहे.

Kia Carnival
किया कार्निवल (Kia)

झोन क्लायमेट कंट्रोल, 12-स्पीकर प्रीमियम म्युझिक सिस्टम आणि लेव्हल-2 ADAS सूट या देण्यात आले आहेत. नवीन किया कार्निव्हलचं मुख्य आकर्षण म्हणजे नवीन ग्रिलसह नवीन फ्रंट फॅशिया. याशिवाय, यात उभ्या स्टॅक केलेले एलईडी हेडलॅम्प, इन्व्हर्टेड एल-आकाराचे एलईडी डीआरएल, कॉन्ट्रास्ट रंगीत स्किड प्लेट, टेलगेटवरील एलईडी लाइट बार, नवीन अलॉय व्हील, नवीन रूफ रेल आणि शार्क फिन अँटेना यांचा समावेश आहे.

Kia Carnival
किया कार्निवल (Kia)

इंजिन : इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, यात फक्त 2.2-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. इंजिन 197bhp पॉवर आणि 440Nm पीक टॉर्क जनरेट करतं. विशेष बाब म्हणजे या कारचं भारतात 2 हजार 796 पेक्षा जास्त बुकिंग आधीच नोंदवलं आहे.

Kia Ev9 : Kia EV9 बद्दल बोलायचं झालं, तर कंपनीनं ही कार फक्त एका GT Line वेरिएंटसह लॉन्च केली आहे. या कारची किंमत 1.3 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही कार लीजिंग पर्यायासह खरेदी केले जाऊ शकते. Kia EV9 ही कार निर्मात्याची फ्लॅगशिप पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV आहे. जी E-GMP प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Kia EV9 फिचर : Kia EV9 ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. EV9 मध्ये तीन स्क्रीनसह पॅनोरामिक डिस्प्ले आहे. 1पहिला 2.3-इंचाचा क्लस्टर, 5-इंचाचा HVAC डिस्प्ले आणि 12.3-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले यात मिळतोय. यात 11-इंच हेड-अप डिस्प्ले (HUD) देखील आहे. EV9 मध्ये अनेक सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर चेतावणी, क्रॉस ट्रॅफिक अलर्टचा यात समावेश आहे.

EV9 मध्ये चार्जिंग दरवाजे आहेत जे इलेक्ट्रॉनिक पुश-टू-ओपन फंक्शनसह किंवा Kia Connect ॲप किंवा कारमधील बटणानं उघडले जाऊ शकतात. EV9 मध्ये डिजिटल की, 3-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट आणि 10 एअरबॅग देखील आहेत. EV9 मध्ये ARAI-प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज 561 किमी सह 99.8 kWh बॅटरी पॅक आहे. EV9 मॉडेलमध्ये 379bhp ची पॉवर आणि 700Nm कमाल टॉर्क प्रदान करते, ज्यासाठी या कारमध्ये ड्युअल-मोटर सेटअप वापरण्यात आला आहे. हे 350kWh DC चार्जरद्वारे केवळ 24 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होऊ शकतं.

हे वाचंलत का :

  1. Google Pay वापरकर्त्यांना मिळणार सहज कर्ज, मुथूट फायनान्सशी करार - Google Pay gold loan
  2. एका तासात Thar Roxx च्या 1.76 लाखांपेक्षा अधिक युनिट्सचं बुकिंग - Mahindra Thar Roxx booking
  3. दसऱ्यानिमित्त 'या' दुचाकीवर मिळतेय ६० हजारांची सुट, iPad जिंकण्याची संधी - Oben Electric Oben Roar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.