जालना - भोकरदनच्या धावडा येथील फयाज खाँ पठाण यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतमजूर महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. नजीरा बी सय्यद हुसेन (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नजीरा बी यांच्या पायाला घोणसने दंश केला. महिलेला सर्पदंश झाल्याचे समजताच शेतमालक फयाज पठाण यांनी तिला धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती महिला -
पतीचे निधन झाल्यापासून नजीरा बी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचे सर्व कुटुंब हाच व्यवसाय करते. शासनाने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून काल (सोमवारी) सायंकाळी धावडा येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला.
कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू; जालन्याच्या धावडा गावातील घटना - धावडा महिला मृत्यू न्यूज
हिवाळा सुरू झाला आहे. या काळात सापांचा उघडपणे वावर काहीसा जास्त असतो. अनेकदा सर्पदंशाच्या घटनाही घडतात. जालन्यात अशीच एक घटना घडली. एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला.