ETV Bharat / state

कोरोना विरुद्धच्या लढ्यात बदनापूरचे पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे अग्रेसर - जालना

कोरोना रोगाशी लढा देण्याची जबाबदारी नगरपंचायतीने गणेश ठुबे यांच्या खांद्यावर टाकल्याने गणेश ठुबे अहोरात्र परिश्रम घेऊन बदनापूर हद्दीत कोरोनाला शिरकाव करण्यापासून थांबविण्याचे कार्य करीत आहेत.

water supply engineer lead corona war in bananapur
कोरोना विरुद्धच्या लढ्यात बदनापूरचे पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे अग्रेसर
author img

By

Published : Apr 29, 2020, 12:01 PM IST

बदनापूर (जालना)- कोरोनाचा देशात आणि महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने हाहाकार माजला. महाराष्ट्रात पुणे शहरात कोरोना संशयित सापडल्याने खळबळ माजली. पुणे, मुंबई सह अन्य शहरात कोरोना रोगाचा शिरकाव झाल्याने शासनाने गंभीर दाखल घेत नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. शासनाने संचारबंदी लागू करून लॉकडाऊन केले, लॉकडाऊनचा निर्णय होताच मुंबई, पुणे शहरात कामानिमित्त गेलेल्या नागरिकांनी गावाकडे निघण्याचा सपाटा लावला. हे लोक औरंगाबाद-बदनापूरमार्गे गावाकडे गेले. बदनापूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी नगरपंचायतीने पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे यांच्यावर सोपवली आहे. गणेश ठुबे 17 मार्चपासून त्यांच्या सहकारी स्वच्छता निरीक्षक अशोक बोकन, रशीद दिलावर पठाण, मिलिंद दाभाडे यांच्यासह सेवा बजावत आहेत.

गणेश ठुबे बदनापूर नगरपंचायतीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शहरातील पाण्याचे नियोजन करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. कोरोना रोगाशी लढा देण्याची जबाबदारी नगरपंचायतीने त्यांच्या खांद्यावर टाकल्याने गणेश ठुबे अहोरात्र परिश्रम घेऊन बदनापूर हद्दीत कोरोनाला शिरकाव करण्यापासून थांबविण्याचे कार्य करीत आहेत.

लॉकडाऊन झाल्यानंतर २५ मार्च रोजी औरंगाबाद शेंद्रा एमआयडीसी मधील मध्यप्रदेशचे रहिवासी असलेले जवळपास ४० मजूर गावाकडे जाण्यासाठी पायी निघाले होते. ते मजूर बदनापूर हद्दीत आल्याने गणेश ठुबे यांनी सहकारी रशीद पठाण व मिलिंद दाभाडे यांना सोबत घेऊन त्या लोकांना थांबवले. वाहनांची व्यवस्था नाही जेवायला नाही अशा गंभीर संकट सापडलेल्या मजुरांना ठुबे यांच्या रूपाने आधार मिळाला. अनेकांचा रोषाला सामोरे जात ठुबे यांनी बदनापूर जिल्हा परिषद शाळेत त्या मजुरांची राहण्याची व्यवस्था केली. मजुरांची आरोग्य तपासणी करून तहसीलदार छाया पवार यांच्या मदतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनात पुन्हा त्यांना कंपनीमध्ये पाठवले.

कोरोनाचा संसर्ग बदनापूरमध्ये होऊ नये म्हणून गणेश ठुबे यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत बदनापूरवासियांकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. शहरात औषध नियमित फवारणी करणे, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांचे नियिजन करणे आदी कार्य योग्य प्रकारे गणेश ठुबे पार पाडत आहेत. गणेश ठुबे यांना सध्या आई वडिलांची सेवा करण्याची संधी मिळत नाही परंतु जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळत असल्याने या मध्येच त्यांना समाधान मिळत आहे.

गणेश ठुबे हे २३ मार्च पासून म्हणजेच तब्बल एक महिण्यापासून बदनापूरच्या नागरिकांची सेवा करत आहेत. बदनापूर शहरात जागोजागी सॅनिटायझर स्टँड बसवून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे हे सातत्याने शहरातील घडामोडीवर लक्ष ठेऊन कर्तव्य बजावत आहेत. बदनापूरकरांचे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून सकाळी ६ पासून शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांना घेऊन स्वच्छता करून घेतली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.