ETV Bharat / state

चौधरी नगरमध्ये रस्त्यावरील पाणी घरात...नागरिकांचे आरोग्य धोक्यात - जालना पाऊस बातमी

जालना शहराला लागूनच मंठा रोडवर चौधरी नगर ही सुमारे दहा वर्षांपूर्वी नवीन वस्ती वसली आहे. सुसज्ज इमारती या भागांमध्ये आहेत. मात्र हा भाग जालना तालुक्यातील देवमूर्ती या ग्रामपंचायत अंतर्गत येतो.

water-in-house-in-chaudhary-nagar-jalna
चौधरी नगरमध्ये रस्त्यावरील पाणी घरात.
author img

By

Published : Jul 8, 2020, 7:00 PM IST

जालना- देवमूर्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या चौधरी नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याबाबत ग्रामपंचायत लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे भविष्यात हा भाग विविध साथीच्या आजारांनी घेरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौधरी नगरमध्ये रस्त्यावरील पाणी घरात.

जालना शहराला लागूनच मंठा रोडवर चौधरी नगर ही सुमारे दहा वर्षांपूर्वी नवीन वस्ती वसली आहे. सुसज्ज इमारती या भागांमध्ये आहेत. मात्र हा भाग जालना तालुक्यातील देवमूर्ती या ग्रामपंचायत अंतर्गत येतो. या भागातील उंच टेकडीवरुन सर्व पाणी जालना शहराच्या दिशेने वाहत येते. त्यामुळे रिकाम्या जागेमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचे डोह साचतात. याठीकाणी अनेक घरांच्या बाजूने चार ते पाच फूट पाणी साचले आहे.

या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन परिसरात रोगराई परसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देऊनही याबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे या भागातील पाणी ग्रामपंचायतीने योग्य पद्धतीने काढून देऊन त्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तसेच या भागात ज्याचे भूखंड आहेत या भूखंडाच्या मालकांनी योग्य तो पर्याय करुन मोकळ्या जागेत पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा- राजगृह हल्ला प्रकरणाची सीआयडी चौकशी करा; रामदास आठवलेंची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.