जालना - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या एका तासामध्ये तीन टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी पदवीधर मतदारांनी सामाजिक अंतर पाळत मतदान केंद्रावर रांग लावली आहे.
जिल्ह्यात 29 हजार 765 मतदार
जालना जिल्ह्यामध्ये 29 हजार 665 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी 24 हजार 250 पुरुष तर, 5 हजार 515 महिला मतदार आहेत.
हेही वाचा - अन्यथा दुचाकीने दिल्लीत जाऊन आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा
तालुकानिहाय मतदारांची वर्गवारी
जालना 9 हजार 10, बदनापूर 2 हजार 117, भोकरदन 3 हजार 905, जाफराबाद 2 हजार 624, परतूर 2 हजार 948, मंठा 2 हजार 160, अंबड 4 हजार 439 आणि घनसांगी 2 हजार 562 असे एकूण 29 हजार 765 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
सामाजिक अंतराचे भान
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार संघाची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सामाजिक अंतराचे भान ठेवले जात आहे. सुरक्षित अंतर ठेवून चौकोनामध्ये मतदार रांगेमध्ये उभे आहेत. यापूर्वी आलेल्या मतदारांचे तापमान तपासून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. ज्या उमेदवारांना मास्क नाही अशांना मस्कचे वाटप होत आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सकाळपासूनच लक्ष ठेवून आहेत
हेही वाचा - धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात