ETV Bharat / state

प्रभात फेरीला गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाची धडक; एक ठार, दोन गंभीर

author img

By

Published : Nov 6, 2020, 5:00 PM IST

वाटूर परतुर रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये अवचार कंडारी हे गाव आहे. गावातील तीन महिला नेहमीप्रमाणे प्रभात फेरीसाठी (मॉर्निंग वॉक) आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून निघाल्या.

unidentified vehicle hit a woman who was on a morning walk jalna (sybmolic)
जालना अपघात (प्रतिकात्मक)

जालना - प्रभात फेरी ल गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाटुर-परतुर रस्त्यावर घडली.

वाटूर परतुर रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये अवचार कंडारी हे गाव आहे. गावातील तीन महिला नेहमीप्रमाणे प्रभात फेरीसाठी (मॉर्निंग वॉक) आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून निघाल्या. त्या मुख्य रस्त्यावर आल्या असता मुख्य रस्त्यावरून घराकडे परत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही ठोस दिली. त्यामध्ये पार्वताबाई अंबादास शिंदे (वय - 55) या जागीच ठार झाल्या. तर उषा गणेशराव नांगरे (वय 45) आणि सुशीला भाऊसाहेब नांगरे (वय 40) याही जखमी झाल्या आहेत. या दोघींनाही जालना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हेही वाचा - दुचाकी आणि कंटेनरचा शिर्डीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

दरम्यान, पार्वताबाई शिंदे यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील महिलांना उपचार कामी मदत केली. दरम्यान, दुपारनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.