जालना : नेहरू नसते तर भारत पाक झाला असता, या संजय राऊत यांच्या वक्तव्याची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी खिल्ली उडविली. भविष्यात सावरकरांच्या बाबतीत असे शब्दप्रयोग करणाऱ्यांसोबत तुम्ही राहणार, की सावरकरांचे समर्थन करणाऱ्यांसोबत राहणार याचा खुलासा आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) करावा, असेही दानवे (Criticized Sanjay Raut Statement) म्हणाले.
प्रत्येकाचे या देशासाठी योगदान : सावरकर तर आमच्या तोंडात आहेत. सावरकर आमच्या आचरणात आहे. सावरकर आमच्या विचारात आहे, हे आम्ही नाकारत नाही. नेहरू नसते तर भारत पाक झाला असता, या संजय राऊत यांच्या व्यक्तव्याची दानवे यांनी खिल्ली उडवली. या देशात जे जे कुणी नेते जन्माला आले त्या प्रत्येकाचे या देशासाठी योगदान राहीले आहे. आम्ही कधीच म्हटलो नाही की पंडित नेहरू- इंदीरांजीचे काही योगदान नाही. पंडित नेहरूंबद्दल असे वक्तव्य केले नाही. पण राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे बोलले, तो विषय पाठीमागे टाकण्यासाठी नेहरूंचा मुद्दा पुढे केला आहे, अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केली. पंडित नेहरू नसते, तर भारत पाकिस्तान झाला असता या संजय राऊत यांच्या व्यक्ताव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या विषयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
सावरकरांबद्दल अपशब्द : आदित्य ठाकरे म्हणाले की, ४०-५० वर्षांचा इतिहास उरून काढण्यापेक्षा भविष्याचा विचार केला पाहीजे. या व्यक्तव्याचाही रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही सरकार चालवले. आणि त्यांच्याच मित्रपक्षाने सावरकरांबद्दल अशा प्रकारचे शब्द काढले. त्यांच्या सोबत तुम्ही पुढच्या काळात राहणार आहे का ? त्यांच्या पासून फारकत घेणार आहे. हा मुद्दा त्यांनी सांगावा. उगाच विषय कुठल्या कुठे नेऊ नये, असा टोला ही दानवे यांनी (Raosaheb Danve Criticized Sanjay Raut) मारला.
सावरकरांचे समर्थन : बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्याबद्दल महाराष्ट्र व देशाला त्यांचे मोठेपण समजावून सांगितले. त्यांचे चिरंजीव, नातू मात्र आज त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवतात, याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी करावा व भविष्यात सावरकरांच्या बाबतीत असे शब्दप्रयोग करणाऱ्यांसोबत तुम्ही राहणार की सावरकरांचे समर्थन करणाऱ्यांसोबत राहणार याचा खुलासा करावा, असेही दानवे (Criticized Sanjay Raut Statement) म्हणाले.
महापुरुषांबद्दल कल्पना नाही : भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणला असे पत्रकारांनी विचारताच, आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? आम्ही मुद्दा घडवून आणला. ज्याला वाचन नाही, ज्याला या देशातील महापुरुषांबद्दल कल्पना नाही. त्यांच्या तोडून निघालेले हे शब्द आहेत. आम्ही कशाला सावरकराचा मुद्दा आणावा? सावरकर तर आमच्या तोडांत आहेत. सावरकर आमच्या आचरणात आहे. सावरकर आमच्या विचारात आहे, हे आम्ही नाकारत नाही. हे आम्ही घडवून आणले नाही. आम्ही तर त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. यावर आम्हाला गर्व (Sanjay Raut Statement) आहे. असेही ते म्हणाले.