जालना - दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीचा मरकज हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या जालन्यातील येथे दोन व्यक्तींना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
डॉक्टरांनी या दोन्ही व्यक्तींना पुढील 14 दिवस क्वॉरेन्टाईन राहण्यासाठी सांगितले असून त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये जुना जालना बाजार चौकी परिसरातील एक आणि मंठा चौफुली परिसरातील एकाचा समावेश आहे.
हेही वाचा - दिल्लीतील 'मरकज'मध्ये सोलापुरातील 17 जण सहभागी; 11 रुग्णालयात भरती तर 6 जण अद्याप आले नाहीत
दरम्यान, गुरुवारी आणखी पाच जणांची यादी आली आहे. या यादीमध्ये घनसांवगी तालुक्यातील तीन, अंबड तालुक्यातील एक आणि भोकरदन तालुक्यातील एक असे 5 व्यक्ती जालन्यात आले होते. त्यांचा शोध घेतला जात आहे.