जालना - विविध चौकांमध्ये उभे राहून ट्रक लुटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना चंदंनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. शेख मोहम्मद शेख समशेर रा. संजय नगर व शेख रुखमन शेख गफार रा. लोधी मोहल्ला जालना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा (एमएच २१ बीजी ०३३४) जप्त केली आहे.
चंदंनझिरा पोलिसांना सिटीझन चौफुली येथे २ व्यक्ती एका ट्रक चालकाला मारहाण करत असून ते ट्रक लुटण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती नियंत्रण कक्षावरून मिळाली. या माहितीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्या दोघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना घरचा आहेर, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
यानंतर त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी स्वत:चे नाव व गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्या दोघांकडून व्हीवो कंपनीचा मोबाइल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली एक ऑटोरिक्षा जप्त केली आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोडले, पोलीस कर्मचारी कांबळे, अनिल काळे, नंदकुमार ठाकूर यांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा - जालन्यात कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या