जालना - कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून रिपब्लिक टीव्ही चॅनलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, गटनेते संतोष अन्नदाते, माजी नगरसेवक अनिल देशपांडे, रिझवान शेख, रमेश जाधव, सोपान सपकाळ, उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रतिनिधी बारोटे यांची उपस्थिती होती.