जालना - कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली होती. ही गैरसोय टाळायची असेल तर झाडे लावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (दि. 5 जून) केले. पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
येथील सिंदखेड राजा रस्त्यावर वन व पर्यटन विभागाचे उद्यान आहे. या उद्यानात अटल धन-वन हा एक उपक्रम राबवला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगलाप्रमाणे येथे झाडे वाढली आहेत. याच्याच दुसऱ्या बाजूला आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर ,वनविभागाच्या वनसंरक्षक वर्षा पवार यांचे हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, विभागीय आयुक्तांच्या आवाहनानुसार 'एका व्यक्त तीन झाडे' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सुदैवाने यावर्षी पाऊसही वेळेवर आणि भरपूर येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. कोरोनाचा काळात ऑक्सिजन मिळत नव्हता, ती कसर आता नागरिकांनी वृक्षारोपण करून भरून काढावी, असे आवाहनही त्यांनी केले. वन विभागाचे अधिकारी श्रीकांत इटलोड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा - नाव दुरुस्तीसाठी दोन हजारांची लाच; पर्यवेक्षक जाळ्यात