जालना - शहर वाहतूक फक्त नावापुरतीच राहिली असून शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत. वाहतूक शाखेतर्फे वसुली मात्र जोरात सुरू आहे.
शहरातील मामा चौकात अस्ताव्यस्त उभे असलेले रिक्षा, भाजी-फळवाल्यांचे गाडे यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. विक्षिप्त हावभाव करून हे हातगाडीवाले महिलांचा मानसिक छळ करतात. शहर वाहतूक पोलिसांसाठी असलेल्या निवाऱ्यांमध्ये दुसरीच दुकाने थाटली गेली आहेत.रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनवारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातांकडे वाहतूक पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या शहर वाहतूक शाखेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
हेही वाचा - मराठवाडा : वर्चस्वासाठी सेना-भाजपची रस्सीखेच, तर आघाडीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड
सर्वे नंबर 488 मध्ये न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि पोलीस अधीक्षक कार्यालय देखील आहे. अशा मुख्य रस्त्यावर मुक्तपणे जनावरे मध्यभागी रस्ता दुभाजकाप्रमाणे उभी असतात.