ETV Bharat / state

अंबडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार - road

या अपघाताची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, जमादार के. बी. दाभाडे, साळवे, गोतीस, जाधव आदींनी धाव घेऊन पंचानामा केला.  तिघांनाही  शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंबड येथे दाखल करण्यात आले.

अंबडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात
author img

By

Published : May 29, 2019, 9:18 PM IST

जालना - लग्न कार्यासाठी माळी पिंपळगाव येथे दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी सहाच्या सुमारास अंबड वडीगोद्री रस्त्यावरील झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर घडली. ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे (उपसरपंच), सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तु एखंडे ( तिघे रा. बदापूर, ता. अंबड) असे मृत व्यक्तींची नावे आहेत.

अंबड तालुक्यातील बदापूर येथील उपसरंपच ज्ञानेश्वर एखंडे हे वरील दोघांसह विना नंबरच्या टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी या मोटारसायकलवरून गावातील मुलाच्या लग्नाला माळी पिंपळगाव येथे जात होते. अंबड-वडीगोद्री रस्त्यावर झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर आले असता त्यांना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच २२ एन ७८६) त्यांना जोराची धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकल स्वार हे ट्रकसोबत सुमारे एक हजार फुटापर्यंत फरफटत गेले. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, जमादार के. बी. दाभाडे, साळवे, गोतीस, जाधव आदींनी धाव घेऊन पंचानामा केला. तिघांनाही शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंबड येथे दाखल करण्यात आले. मृत व्यक्ती ह्या एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे चुलत भाऊ होते. मयत नारायण दत्तू एखंडे यांच्या मुलीचा ७ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:Body:

ट्रक मोटार सायकलचा अपघात ; तिन जण जागीच ठार

अंबड जवळील घटना

- लग्नासाठी माळी पिंपळगाव येथे मोटार सायकलवर जात असलेल्या तिन जणास पाठी मागुन भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची ठोस दिली,ही ठोस एवढी भयानक होती की,ते तिघेही जागीच ठार झाले. ही घटना आज दि.29 मे रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास अंबड वडीगोद्री रस्त्यावर झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर घडली आहे. ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे (उपसरपंच), सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तु एखंडे तिन्ही रा.बदापुर ता.अंबड जि.जालना असे मृत व्यक्तींचे नावे आहेत.

  अंबड तालुक्यातील बदापुर येथील उपसरंपच ज्ञानेश्वर एखडे यांच्यासह वरील दोघेजण टि.व्ही.एस.कंपनीची स्टार सिटी (विना नंबर) वर बसुन गावातील मुलाच्या लग्नाला गेवराई तालुक्यातील माळी पिंपळगाव येथे जात होते. अंबड- वडीगोद्री रस्त्यावर झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोरन जात असतांना पाठी मागुन येणारा ट्रक क्र. MH-22-N-786 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात व निष्काळजी पणाने चालवुन त्यांच्या मोटार सायकलला पाठी मागुन जोराची ठोस दिली. त्यामुळे मोटार सायकल स्वार हे ट्रक सोबत सुमारे एक हजार फुटापर्यंत फरफटत गेले. त्यामुळे ते तिघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पो.उप.नि.शैलेश शेजुळ, जमादार के.बी.दाभाडे, साळवे, गोतीस, जाधव आदींनी धाव घेऊन पंचानामा करुन वाहतुक सुरळीत केली.तिघानाही  शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंबड येथेदाखल करण्यात आले आहे. मयत व्यक्ती हे एकाच कुटूंबातील असुन एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मयत नारायण दत्तु एखंडे यांच्या मुलीचा सात दिवसापुर्वी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. एकाच घरातील तिन व्यक्तींचा मृत्यु झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.