ETV Bharat / state

जालना कोरोना इफेक्ट : भोकरदनमध्ये तीन दिवस 'जनता कर्फ्यू', आजपासून सुरुवात - जालना कोरोना ताजी बातमी

भोकरदन शहरातील काझी मोहल्ला येथे एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर, संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून रुग्णाच्या नातेवाईकांसह संपर्कातील इतर व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, त्याच पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन 14 जून ते 16 जून असे तीन दिवस सर्व दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.

भोकरदन शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू
भोकरदन शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू
author img

By

Published : Jun 14, 2020, 4:52 PM IST

कोरोनाच्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोकरदर शहरात जनता कर्फ्यू

जालना - जिल्ह्याच्या भोकरदन शहरातील काझी मोहल्लामधील कुरेशी गल्लीतील एकजण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात प्रचंड खळबळ माजली होती. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सदर भाग सील करून रुग्णाचे नातेवाईक व इतर व्यक्तींना क्वारंटाईन केले होते. तर, शहरातील व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन 14 जून ते 16 जून असे तीन दिवस सर्व दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक सेवेमधील रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, कृषी सेवा केंद्र व दुध याला सूट देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रविवार 14 रोजी पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. तसेच सर्वसामान्य जनतेनेही यात सहभाग नोंदवला व आपापल्या घरीच राहणे पसंत केले.

राज्यासह जालना जिल्ह्यातील इतर तालुका व ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला होता परंतु, भोकरदन शहर मात्र अपवाद राहिले होते. त्यामुळे प्रशासनासह नागरिकही बिनधास्त होते. शहरातील व्यवहारही सुरळीत चालू झाले होते. तसेच काही राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कोव्हीड योद्धे, इतरांचे आधार मानून त्यांचा आदर सत्कारही केला होता. कोव्हीड योद्धे व सर्वसामान्य जनतेलाही हा उपक्रम आवडला होता हे विशेष. दरम्यान, शनिवारी दुपारी अचानक सर्व शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची चर्चा सुरू झाली. अन् प्रत्येकजण बातमीची शहानिशा करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रशासनाने तातडीने सदर भाग सील करून रुग्णाचे नातेवाईक व संपर्कातील इतर व्यक्तींना क्वारंटाईन केले. या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सर्वांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत या कर्फ्यूत सहभाग नोंदवला. तर, याप्रमाणे 16 तारखेपर्यंत व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेनेही जनता कर्फ्यू पाळण्यासाठी मदत करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

दरम्यान, आज रविवारी सकाळी कुरेशी मोहल्ला व परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वे करण्यात आला आहे. तसेच कुणालाही काही त्रास असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.