ETV Bharat / state

जालन्यात गणेश विसर्जनाची जय्यत पूर्वतयारी; मुख्याधिकार्‍यांनी केली पाहणी - Ganesh visarjan jalna

येत्या गुरूवारी म्हणजेच १२ तारखेला गणेश विसर्जन असल्याने त्या पार्श्वभूमीवर नारपालिकेच्या वतीने विरसर्जनाच्या पूर्व तयार करण्यात येते. त्या पूर्व त्यारीची पाहणी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

पाहणी करताना
author img

By

Published : Sep 7, 2019, 11:23 AM IST

Updated : Sep 7, 2019, 2:38 PM IST

जालना - येत्या गुरूवारी म्हणजेच १२ तारखेला गणेश विसर्जन असल्याने त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने विसर्जनाच्या पूर्व तयार करण्यात येते. त्या पूर्व तयारीची पाहणी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

माहिती देताना

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सुरक्षिततेत कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील मोतीबाग तलावाजवळ चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने तलावाचा काही भाग यात गेला आहे. त्यामुळे तलावाचा भाग कमी झाला आहे. यंदा कमी पावसामुळे तलावा पुरेसे पाणी नसल्याने मोठ्या गणेश मूर्तांसाठी तलावात पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहने कोणत्या दिशेने येतील आणि परत जातील याचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. पूर्वी घरगुती गणपती तसेच लहान गणेश मूर्तींचे विसर्जन मुक्तेश्वर तलावामध्ये करण्यात येत होते. परंतु, या तलावात सध्या विसर्जनास बंदी असल्याने मोतीबागेलगतच लहान कृत्रीम हौदाची सोय करण्यात आली आहे. पाहणीवेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी केशव कानगुडे, बांधकाम अभियंता सौद, नगरसेवक मेघराज चौधरी हे उपस्थित होते.

Intro:जालना

गणपती बाप्पाच्या आगमनाची नागरिक तयारी करतात तर बाप्पांच्या विसर्जनाची तयारी नगरपालिकेला करावी लागते. जालना नगरपालिकेकडून गणेश विसर्जनाच्या पूर्व तयारीची पाहणी जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी केली. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरक्षिततेविषयी कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी या मोती तलावात गाळा मध्ये फसून तीन गणेश भक्तांचा मृत्यू झाला होता.

Body:गुरुवार दिनांक 12 रोजी गणेश विसर्जन आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना शहरात असलेल्या मोतीबाग तलावातील पाण्याच्या पातळीची ,तिथे असलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली, या तलावाच्या बाजूने चौपदरी रस्त्याचे रुंदीकरण होत असल्यामुळे तलावाचा बराचसा भाग कमी झाला आहे. आणि आत्तापर्यंत पडलेल्या पावसा नुसार तलावात पाहिजे तेवढे पाणी नाही. त्यामुळे मोठा धोका नसला तरीही मोठमोठे गणपती विसर्जनासाठी इथे पाणीही उपलब्ध नाही. यावर काय उपाययोजना करता येतील तसेच तलावाच्या काठावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकारी नार्वेकर यांनी नगरपालिकेचे अधिकारी केशव कानगुडे ,बांधकाम अभियंता सौद,नगरसेवक मेघराज चौधरी,यांच्यासह मोती तलावाची पाहणी केली. तसेच कोणती वाहने कुठल्या दिशेने येतील याविषयी देखील नियोजन केले आहे .दरम्यान गावातून येणारे छोटे गणपती हे मोतीबागेच्या बाजूलाच असलेल्या कृत्रिम हृदयामध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत .तर सार्वजनिक गणेश मंडळाचे आणि मोठ्या मूर्ती या मोती तलावात औद्योगिक वसाहत परिसरातील बाजूने विसर्जित केल्या जाणार आहेत. शहरांमध्ये फक्त मोती तलावातच विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत घरगुती गणपती मुक्तेश्वर तलावांमध्ये देखील विसर्जित करण्यात येत होते मात्र आता हे गणपती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.