ETV Bharat / state

कोरोना : जालन्याच्या देऊळगाव राजातील 'बालाजी लळीत'मध्ये फटाके विक्रीवर परिणाम

राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक उत्सव साजरे होतात. या उत्सवांदरम्यान कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढालही होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ही उलाढाल ठप्प झाली आहे. जालन्यातील फटाके विक्रीवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

author img

By

Published : Nov 6, 2020, 1:34 PM IST

fire crackers
फटाके

जालना - दिवाळी सुरू होण्यासाठी अवघे आठ दिवस बाकी आहेत. मात्र, जालन्यातील फटाके बाजार अद्याप सामसूम आहे. दरवर्षी हा बाजार चतुर्थीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरू होतो. या दिवशी देऊळगाव राजा येथील प्रति तिरुपती बालाजीचा जन्मोत्सव असतो. त्याला 'लळीत'या नावाने ओळखले जाते. या लळीतच्या दिवशीच सुमारे 40 ते 50 टक्के फटाक्यांचा व्यवसाय होतो.

जालन्यातील फटाके बाजार पेठेबाबत माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

काय आहे हे लळीत?

तिरुपती बालाजीचे प्रतीस्थळ म्हणून देऊळगाव राजा येथील बालाजीची ख्याती आहे. पुरातन बांधकाम असलेल्या या मंदिराच्या समोर दगडांच्या शिळा रोवलेले भव्य पटांगण आहे. या प्रांगणावर बालाजीचा जन्मोत्सव म्हणजेच 'लळीत' होतो. या उत्सवादरम्यान भव्य प्रांगणावर पुरातन काळातील लाकडी खांब 'लाटा' पडतात. मात्र, यामध्ये कोणालाही जखम किंवा दुखापत होत नाही. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. चतुर्थीपासून 8 दिवस ही जत्रा सुरू असते. या काळात येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा व्यापार होतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे देऊळगाव राजा येथील लळीतचा उत्सव झाला नाही. त्यामुळे फटाक्याचा हा व्यवसाय झाला नाही.

या वर्षी फटाक्यांमध्ये नवीन प्रकार नाही

यावर्षी नवीन काय आहे? असे म्हणत फटाक्यांच्या नवीन प्रकाराकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र, यावर्षी चीनच्या फटाक्यांवर बंदी असल्यामुळे नवीन कोणताही प्रकार बाजारात आलेला नाही. पारंपरिक पद्धतीचे फटाके आणि मागच्या वर्षीचे शिल्लक असलेलेच फटाके विक्रेत्यांकडे आहेत. त्यामुळे ग्राहकांना उपलब्ध असलेलेच फटाके खरेदी करावे लागणार आहेत.

१०० दुकानांना आहे परवानगी -

देऊळगाव राजा येथील फटाके बाजार सुरू करण्‍यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार जालन्यात आझाद मैदान येथे 50, जुन्या जालन्यातील कै. घोगरे स्टेडियम येथे 20 आणि जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात 30 परवाना मिळालेली दुकाने आहेत. एक परवाना काढण्यासाठी व्यावसायिकाला पंधरा ते वीस हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये मैदानावरील दुकान थाटण्यापासून ते त्याच्या रखवालीपर्यंतच्या खर्चाचा समावेश आहे.

यावर्षी फक्त तीन कोटींचा उडणार बार -

दरवर्षी चार ते पाच लाखांचा माल प्रत्येक व्यवसायिक मागवत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आणि फटाक्यांवर येणारी बंधने लक्षात घेता व्यापाऱ्यांनी फक्त दोन ते अडीच लाख रुपयांची फटाके खरेदी केली आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात पाऊस पडल्यामुळे या बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे गेल्यावर्षीचे व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहेत. यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीतही तीन कोटींच्या फटाक्यांचा बार उडण्याची शक्यता आहे.

आठ दिवसांत होते तीस ते चाळीस हजार रुपयांची कमाई -

फटाका व्यवसायात एक रुपयाचा दीड रुपया होतो, असे म्हटले जाते. फटाका व्यावसायिकांचा आठ दिवसांचा खर्च आणि विक्री लक्षात घेता प्रत्येक व्यावसायिकाला तीस ते चाळीस हजार रुपये नफा मिळतो. मात्र, त्यासाठी त्याला सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दुकान उघडून बसावे लागते. एक महिना अगोदरपासूनच आपल्या आप्तस्वकियांकडे दुकानाची जाहिरातकरून ग्राहक पक्के करून ठेवावे लागतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.