ETV Bharat / state

Attacked By Sand Mafia : वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना तहसीलदारावर हल्ला

author img

By

Published : Feb 23, 2023, 12:05 PM IST

Updated : Feb 23, 2023, 1:19 PM IST

अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केल्याच्या विरोधात तहसीलदारांच्या केबिन मध्ये अरेरावी करून अंबडच्या तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकारामुळे माफियांच्या दहशतीने जालना जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनेच्या निशेधार्थ कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. (Ambad Tehsildar)

Sand mafia attack on Tehsildar
वाळू माफियांचा तहसीलदारावर हल्ला
वाळू माफियांचा तहसीलदारावर हल्ला

जालना: जालना जिल्ह्यातील अंबड चे तहसीलदार विदयाचरण जगन्नाथ कडवकर हे गुरवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या तहसील कार्यालयातील कक्षात शेतीच्या सुणावनीचे अर्धन्यायीक कामकाजाचे अनुषंगाने अँटी चेंबरमध्ये संबंधीत संचिका पाहत असतांना तहसिलदार कक्षासमोर असलेल्या शिपाई विकास डोळसे व जीवन म्हस्के यांनी पंकज सोळुंके रा.गोंदी यास थांबण्याचे सांगीतले असता तो न थाबंता तहसीलदार यांच्या अँटी चेंबरमध्ये आला व तु माझा फोन का उचलत नाही, तु काल आमचे गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु साठा का जप्त केला. तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल का केला म्हणुन शिवीगाळ करु लागला.

त्याचा अवतार पाहता तो हल्ला करेल असे वाटल्याने तहसीलदार कक्षात आले तिथेही तो त्यांच्या मागेच आल्याने तहसीलदार कक्षाचे बाहेर पडले व कोरीडोर मध्ये आले. तिथून ते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना फोन लावत असतानाच, तु कोणाला फोन लावायला, तु माझा फेरफार का मंजुर केला नाही असे म्हणुन दोन वेळा त्याने तहसीलदार यांच्या कानाखाली गालावर चापट मारल्या व खांदयावर ही मारले. हे घडत असताना कार्यालयीन शिपाई व ईतर लोकांनी त्याल पकडले. एका व्यक्तीने त्याला ओढत बाहेर काढले.तेव्हा त्याने मोठं मोठ्याने शिवीगाळ करत मी तुला पाहुन घेतो असे म्हणुन तहसीलदारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व बाहेर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत बसुन तो पसार झाला.

गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु जप्तीच्या तहसीलदार अंबड यांनी केलेल्या कारवाई नंतर आज सकाळी गोंदी पोलीस ठाणे येथे संभाजी खरात यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा व त्याचा फेरफार मंजुर न केल्याचा मनात राग धरुन पंकज सखाराम सोळुंके रा. गोंदी याने तहसीलदार कार्यालयात येवुन मला शिवीगाळ करुन, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या चापट बुक्याने मारहाण करुन आमच्या शासकीय अर्धेन्यायीक कामकाजास अडथळा निर्माण केला. सदर घटना तहसील कार्यालय अंबड च्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाली असेल अश्या प्रकारची तक्रार तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५३,३३२,३२३,३५२,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा : Stray Dogs News: अन्न देऊन काळजी घेतली तर भटकी कुत्री आक्रमक होणार नाहीत- मुंबई उच्च न्यायालय

Last Updated : Feb 23, 2023, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.