ETV Bharat / state

जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयात रंगल्या 'चहा पार्ट्या' - tea party at badnapur tehsil in jalna

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने बदनापूर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेले हे नामनिर्देशनपत्र दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चहा पार्ट्या रंगल्या.

tea-party-at-tehsil-office-during-nomination-process-for-gram-panchayat-election-in-jalna
ग्रामंचायत निवडणूक : जालन्यातील तहसील कार्यालयात रंगल्या 'चहा पार्ट्या'
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:41 PM IST

Updated : Dec 29, 2020, 8:07 PM IST

जालना - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक आता रंगात आली आहे. उद्या नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी होती. बदनापूर तहसीलदेखील त्याला अपवाद नाही. या कार्यालयात मोठा परिसर असल्यामुळे परिसरामध्ये गावाकडून आलेल्या ग्रामस्थांच्या चहा पार्ट्या रंगू लागल्या आहेत.

तहसील कार्यालयात रंगल्या 'चहा पार्ट्या'

60 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक -

बदनापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 186 प्रभाग आहेत. तसेच 504 सदस्य या जागांवर निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे उद्या एकच दिवस शिल्लक असल्याने परिसरात आणि ग्रामस्थांची तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झालेली आहे.

अर्ज भरायसाठी फिरायची गरज नाही -

तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने तहसीलच्या व्हरांडामध्ये 20 टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर संबंधित गावांची नावे लिहिलेले असल्यामुळे आलेल्या ग्रामस्थांना आपला अर्ज कुठे भरायचा यासाठी जास्त फिरण्याची गरज पडत नाही. तसेच कालपर्यंत 165 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये आजदेखील भर पडली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल पडलेले आहेत. या पॅनलमध्ये सात-आठ सदस्यांसोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे एका गावच्या पॅनलमध्ये पंधरा ते वीस गावकर्‍यांचा समावेश आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेले हे नामनिर्देशनपत्र दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर या परिसरामध्ये चहा पार्ट्या रंगल्या.

हेही वाचा - चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले

Last Updated : Dec 29, 2020, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.