ETV Bharat / state

जालन्यामध्ये टँकरच्या फेऱ्यांचाही तुटवडा, पाण्यासाठी नागरिकांची वणवण - टँकर

जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून 1 हजार 547 टँकरच्या फेऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे.

जालन्यामध्ये मंजुरीपेक्षा कमी टँकरच्या फेऱ्या, पाण्यासाठी नागरिकांची वणवण
author img

By

Published : May 29, 2019, 8:35 PM IST

जालना - जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून 1 हजार 547 टँकरच्या फेऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात 1 हजार 185 फेऱ्या होत असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.

जिल्ह्यामध्ये 28 मे च्या आकडेवारीनुसार 511 गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. खासगी आणि सरकारी अशा एकूण 637 टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या टँकरनी 1 हजार 547 फेऱ्या करणे अपेक्षित आहे. मात्र, या फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामध्ये तब्बल 362 टँकरची तफावत आहे. त्यामुळे उपाययोजना करुनही जनतेला पाण्यासाठी वणवण करत फिरण्याची वेळी आली आहे.

प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. परंतु तांत्रिक बाबींमुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. सध्या खासगी आणि सरकार पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने 685 विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून 11 लाख 26 हजार 326 नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Intro:जालना जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून 1547 टँकरच्या खेपा करण्यास मंजुरी दिली .मात्र प्रत्यक्षात 1185 खेपा होत असल्यामुळे प्रशासनाने प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.शासकीय 19 तर खाजगी618 आशा एकूण 637 टँकर च्या माध्यमातून या खेपा करायच्या आहेत.

Body:दिनांक 28 मे च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये 511 गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. खाजगी आणि सरकारी अशा एकूण 637 टँकर प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या टँकरनी 1547 खेपा करणे अपेक्षित आहे जेणेकरून नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल ,असे नियोजन प्रशासनाने केले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र 1185 खेपा या टँकरच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे तब्बल 362 टॅंकरचा फरक होत असल्याने जनतेला पाणी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने पूर्ण उपाययोजना करूनही तांत्रिक बाबींमध्ये नागरिकांचे पाणी अडकले आहे. सध्या खाजगी आणि सरकार पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने टँकर साठी आणि टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करणाऱ्या 685 विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातूनच 11लाख26हजार 326 नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतआहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.