जालना - जिल्ह्यात सध्या परतुर येथील उद्योजक राजेश नहार या सुपारी किलरची चर्चा होत आहे. या संदर्भातील दोन घटनांपैकी एका घटनेतून सुखरूप वाचलेले, उद्योगपती गौतम मुनोत यांसह काही उद्योजकांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक चैतन्य यांची भेट घेतली. यावेळी उद्योगपती गौतम मुनोत यांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल माध्यमांना माहिती दिली.
हेही वाचा... ईशान्येकडील राज्यांत नागरिकत्व विधेयकाचे पडसाद, १२ तासांचा कडकडीत बंद
परतुर येथील उद्योजक राजेश नहार यांनी जालना येथील बांधकाम व्यवसायातील उद्योगपती गौतम मुनोत यांचा खून करण्याची पन्नास लाखात सुपारी दिली होती. दिनांक 22 जुलै 2019 ला मंठा चौफुली येथील गौतम मुनोत यांच्या घरी सुपारी घेतलेल्या आरोपींनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात दरोडेखोरांना घरातील सर्व दारे तोडता आली. मात्र ज्या खोलीमध्ये गौतम मुनोत आपल्या परिवारासह झोपले होते, त्या खोलीचे दार तुटले नाही.
हेही वाचा... 'खडसे सर्वांचे मित्र; पवारांसोबतच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये'
घरात काहीतरी गडबड होत असल्याची माहिती मिळताच मुनोत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांना फोन लावला. अवघ्या काही वेळात पोलीस तिथे पोहोचले. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. हा दरोड्याचा प्रकार असल्याच्या संशयाने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली होती. मात्र 31 ऑक्टोबरला दुसरे एक व्यापारी विमल संघवी यांच्यावर सिंदखेड राजा रोडवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाचा तपास करत असताना राजेश नहार यांचे नाव पुढे आले.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग
व्यवसायाच्या देवाणघेवाणीतून ही सुपारी दिली असल्याचे पुढे आले. सध्या नहार आणि त्यांचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गौतम मुनोत हे सुखरूप आहेत. त्यामुळे पोलिसांचे आभार मानण्यासाठी शहरातील उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक चैतन्य यांची भेट घेतली. तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने एक निवेदन दिले. या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह यांची भेट घेतली, त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.