ETV Bharat / state

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत मिळणारे विद्यावेतन गायब; पालक संतप्त, शिक्षक त्रस्त - Child Labour

जिल्ह्यात सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबर रोजी बंद पडला. मात्र, या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना मिळणारे विद्यावेतन अद्याप या मुलांना मिळालेले नाही. केंद्रचालक बँक खात्यात पैसे जमा झाले असल्याचे सांगत त्यांना त्यांना बँकेत पाठवत आहेत. परंतु, संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे हे विद्यावेतनाचे पैसे गेले कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बालकामगारांचे विद्यावेतनाचे पैसे गेले कुठे, संतप्त पालकांचा सवाल

author img

By

Published : Jan 14, 2020, 5:23 PM IST

जालना - जिल्ह्यात 2004 पासून सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबर रोजी बंद पडला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे विद्यावेतन न मिळाल्यामुळे आता पालक हैराण झाले आहेत. या पालकांचा ससेमिरा केंद्रचालकाकडे असल्यामुळे शिक्षक त्रासले आहेत.

बालकामगारांचे विद्यावेतनाचे पैसे गेले कुठे, संतप्त पालकांचा सवाल

हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी शिक्षकांकडून वेळोवेळी सर्वे करून बालकामगार म्हणून काम करत असलेल्या मुलांना वीटभट्ट्या, पंचरची दुकाने, हॉटेल आदी ठिकाणाहून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दरमहा या विद्यार्थ्यांना ४०० रुपये विद्यावेतन जाहीर केले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या हजेरी पटावरून त्यांना दरमहा 400 रुपये मिळणे अपेक्षित होते.
सर्वे केल्यानंतर या राष्ट्रीय बालकामगारांना या प्रकल्पाच्या शाळेत आणल्यानंतर त्यांची वेळोवेळी हजेरी घेऊन त्यांना दरमहा ४०० रुपये दिले जात असल्याचे प्रकल्प संचालकांनी सांगितले आहे. मात्र, ३० तारखेला हा प्रकल्प बंद झाला आणि सर्वत्र या प्रकल्पाचा अनागोंदी कारभार बाहेर यायला लागला. जाफराबाद येथील या प्रकल्पाच्या शाळेतील बालकामगारांना विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नावावर उचलले जाणारे विद्यावेतन गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालकांनी केंद्र चालकाच्या मागे विद्यावेतनासाठी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. केंद्रचालक बँक खात्यात पैसे जमा झाले असल्याचे सांगत त्यांना त्यांना बँकेत पाठवत आहेत. परंतु, संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. उलट बँक व्यवस्थापक खात्यावर किमान १०० रुपये तरी जमा करा असे ते म्हणताहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पैसे कुणी हडप केले? असा संतप्त सवाल या बालकामगारांचे पालक करीत आहेत.

हेही वाचा - जालन्यात 'रस्ता सुरक्षा रॅली'चे आयोजन, 'हेल्मेट घाला अपघात टाळा'च्या घोषणा

आपल्या मुलाला शिक्षण मिळेल आणि बालकामगार म्हणून दुसरीकडे काम करत असताना मिळणारी रक्कम ही शासनाच्या मदतीमुळे आपल्याला मिळेल. या भोळ्या आशेने या पालकांनी आपल्या हाताखाली काम करणार्‍या मुलांना शाळेत पाठविले होते. मात्र, आता त्यांचे 'तेल ही गेले आणि तूपही गेले' अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या पालकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या बाल कामगारांच्या विद्या वेतनाची मागणी केली आहे.

हेही वाचा - नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, जालन्यात गोयल यांच्या प्रतिमेचे दहन

Intro:जालना जिल्ह्यात 2004 पासून सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबर रोजी बंद पडला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे विद्यावेतन हे न मिळाल्यामुळे आता पालक हैराण झाले आहेत. या पालकांचा ससेमिरा केंद्रचालकाकडे असल्यामुळे शिक्षक परेशान झाले आहेत.

Body:प्रकल्प चालू ठेवण्यासाठी शिक्षकांकडून वेळोवेळी सर्वे करून बाल कामगार म्हणून काम करत असलेल्या वीटभट्ट्या ,पंचर चे दुकाने, हॉटेल आदी ठिकाणाहून या बाल कामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दरमहा या विद्यार्थ्यांना चारशे रुपये विद्यावेतन जाहीर केले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या हजेरी पटावरून त्यांना दरमहा 400 रुपये मिळणे अपेक्षित होते. आणि सर्वे केल्यानंतर या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या शाळेत आणल्यानंतर त्यांची वेळोवेळी हजेरी घेऊन त्यांना दरमहा चारशे रुपये दिल्या जातात .असे प्रकल्प संचालकांनी सांगितले आहे. मात्र तीस तारखेला हा प्रकल्प बंद झाला आणि सर्वत्र या प्रकल्पामधील अनागोंदी कारभार बाहेर यायला लागला. जाफराबाद येथील या प्रकल्पाच्या शाळेतील बालकामगारांना विद्या वेतन मिळालेले नाही .त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नावावर उचलल्या जाणारे विद्यावेतन गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालकांनी केंद्र चालकाच्या मागे विद्या वेतनासाठी चौकशीचा ससेमिरा लावला आहे .केंद्र चालक बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत असे म्हणून त्यांना बँकेत पाठवत आहेत ,परंतु संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत उलट बँक व्यवस्थापक खात्यावर किमान शंभर रुपये तरी जमा करा असे म्हणताहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पैसे कुणी हडप केले? असा संतप्त सवाल या बाल कामगारांचे पालक करीत आहेत. आपल्या मुलाला शिक्षण मिळेल आणि बालकामगार म्हणून दुसरीकडे काम करत असताना मिळणारी रक्कम ही शासनाच्या मदतीमुळे आपल्याला मिळेल ,या भोळ्या आशेने या पालकांनी आपल्या हाताखाली काम करणार्‍या मुलांना शाळेत पाठविले होते .मात्र आता त्यांचे "तेल ही गेले आणि तूपही गेले" अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या पालकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या बाल कामगारांच्या विद्या वेतनाची मागणी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.