जालना - मंठ्यातील एका विद्यालयात दहावीच्या परीक्षा पार पडल्या. या परीक्षा केंद्रावर भूगोल विषयाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 4 मार्च) पुन्हा कॉप्या पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही ईटीव्ही भारतने ( SSC Exam Copy Jalna ) मराठी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याची बातमी दाखवली होती. आज भूगोल विषयाच्या पेपरलाही दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे नावालाच असलेल्या भरारी पथकाने जिल्ह्यातील कॉपी चालणाऱ्या केंद्रा बरोबरच कॉपी बहाद्दरांवर काय कारवाई केली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी करताना आढळल्यास शाळेची मान्यता रद्द केली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी केली होती. मात्र, त्यानंतरही मंठ्यातील एका विद्यालय परीक्षा सेंटरमध्ये कॉप्या सुरुच असल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षणमंत्र्यांची घोषणा केवळ नावालाच असल्याचे दिसून आले.
हेही वाचा - Accused Suicide Attempted Jalna : जालन्यात संशयित आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न