जालना- राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानाने स्वतःवर झाडली गोळी आत्महत्या ( SRPF jawan committed suicide ) केली आहे. अनिल दशरथ गाढवे (वय 35 वर्षे) असे या जवानाचे नाव आहे. नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचे सुत्राने सांगितले.
जालना येथील राज्य राखीव पोलीस बल ( Maharashtra reserve police ) गट क्रं.3 च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून मंगळवारी ( suicide by firing in Jalna ) आत्महत्याचा करण्याचा प्रयत्न केला होता. कर्तव्यावर असताना विश्राम खोलीत स्वतः जवळील रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. या संपूर्ण घटनेने एकच खळबळ उडाली होती. राज्य राखीव पोलीस बलाच्या या जवानास 1 वर्षा पासून कौटुंबीक मानसिक त्रास होता. पत्नी घर सोडून माहेरी होती. तसेच कर्जबाजारी असल्यामुळे निराशेतून टोकाचे पाऊल जवान गाढवे याने उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे ( Bajar Police Jalna ) प्रभारी पोलीस उपनिरीक्षक साळवे, पोलीस उप निरिक्षक राजेंद्र वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हा जवान गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या जवानाचा या घटनेत एक डोळा निकामी झाला होता. पण रात्रीच प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याची प्राणज्योत मावळली आहे.