ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे... - विविध प्रकारचे ऑनलाइन शिक्षण

मागील ४ वर्षांत आतापर्यंत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान मिळवणे अत्यंत कष्टाचे काम होते. मात्र, एका शिक्षकेच्या जिद्दीने या सगळ्यांवर मात केली आहे.

ऑनलाईन शाळा
ऑनलाईन शाळा
author img

By

Published : Aug 10, 2020, 5:16 PM IST

Updated : Aug 11, 2020, 5:19 PM IST

जालना - राज्यासह देशात कोरोना संक्रमण वाढायला लागले आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहिला. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता दरवर्षीच्या नियोजीत वेळापत्रकानुसार शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेली. मात्र, जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक गाव असे आहे, जिथे २०१६पासूनच ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी उपक्रम राबवला जात आहे. याच संदर्भातील 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.

दोदडगावची उपक्रमशील शाळा...

अंबड तालुक्यातील दोदडगाव हे जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले छोटेसे गाव. जेमतेम पहिली ते सहावीपर्यंत असलेली शाळा. दरम्यान, 2010 ला नीता अरसूळे या शाळेत प्राथमिक सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. यासोबतच 2016ला त्यांनी मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीशी संपर्क साधून विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर विषयीचे ज्ञान मिळवले, एवढेच नव्हे तर नॅशनल जिओग्राफीच्या तंत्रज्ञानासंदर्भातील त्यांनी अनेक कोर्स देखील केले. या कोर्सचे त्यांनी अनेक प्रमाणपत्रेही मिळवली. सोबतच 'नॅशनल जिओग्राफी एज्युकेटर' हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव शिक्षिका आहेत.

हेही वाचा - 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी ज्ञानगंगा

'हा' पुरस्कार मिळाल्याने भूगोल आणि विज्ञान हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना वेगळ्या, सोप्या आणि त्यांना आवडतील अशा पद्धतीने कसे शिकवता येतील, यासंदर्भातील नीता यांनी प्रशिक्षण मिळवले. मात्र, हे सर्व करण्यासाठी आवश्यकता होती आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच संगणक किंवा टॅब आणि त्याला लागणाऱ्या इंटरनेटची. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट मिळेलही मात्र, लहान मुलांच्या हातात टॅब किंवा संगणकासारखे तंत्रज्ञान देणे शक्य नव्हते. तर काही पालकांनी तर टॅबवर कोठे शिक्षण असते का? असा प्रश्न उपस्थित करत नाराजी सुद्धा व्यक्त केली. यामुळेच विद्यार्थ्यांना असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या दात्यांचा त्यांनी शोध घेणे सुरू केले. दरम्यान नीता यांचा प्रयत्नांची जालना शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या विनोदराय अभियंत्रिकीचे संचालक सुनील रायठठ्ठा यांच्याशी संपर्क आला. यांनंतर सुनीलजींनी दोदडगावच्या या ग्रामीण शाळेला 21 टॅब भेट म्हणून दिले आणि नीता यांच्या उपक्रमाला सुरूवात झाली.

या टॅब्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे दोदडगाव सारख्या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी देखील जगाची माहिती घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आजही हे विद्यार्थी शिक्षिका नीता अडसूळ यांच्याकडून ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत आहेत. जिद्द आणि तळमळ असेल तर छोट्याशा खेड्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले काम कसे करता येईल याचे हे एक उत्तम उदाहरण आहे, असेच म्हणावे लागेल. याशाळेचा आदर्श घेऊन राज्यातील इतर शाळांनी देखील असेच उपक्रम राबवण्याची आशा सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - मंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते या गावातील शाळा !

Last Updated : Aug 11, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.