जालना - नव्याने तयार करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर सेंट्रल ट्रेंड ऑफ युनियन केंद्राच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काय आहेत मागण्या-
चारही संहिता रद्द कराव्यात, नव्याने तयार करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करावेत, विज विधेयक 2020 मागे घ्यावे, सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण बंद करावे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना अमलात आणावी, राज्य सरकारने लॉकडाउन काळासाठी असंघटित उद्योगधंद्यातील कामगारांना दहा हजार रुपये उदरनिर्वाह अनुदान द्यावे, आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना मासिक साडेसात हजार रुपये रोख रक्कम द्यावी, तसेच सर्व गरजूंना मासिक दरडोई दहा किलो मोफत धान्य द्यावे, ह्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेला या आंदोलनाच्या वेळी महिलांचा देखील समावेश होता. कल्पना आर्दड, मंदा तींनगोटे, मीना भोसले, संगीता निर्मळ, यांच्यासह गोविंद आर्दड, मधुकर मोकळे, अनिल मिसाळ, सुभाष मोहिते यांचाही यामध्ये समावेश होता.
हेही वाचा-चोरांना पाहून पोलीस पळतात ही दुर्दैवी घटना- अजित पवार