ETV Bharat / state

'पंकजाच नव्हे तर सर्वांसाठीच शिवसेनेची दारं खुली'

पंकजा मुंडेंच नव्हे तर शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. मग त्या पंकजा मुंडे असो किंवा इतर कोणी जे कोणी येईल त्यांचे पक्षामध्ये स्वागतच आहे, असेही खोतकर म्हणाले.

अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकर
author img

By

Published : Oct 21, 2020, 8:53 PM IST

Updated : Oct 21, 2020, 9:25 PM IST

जालना - 'भारतीय जनता पक्षाने जे पेरले ते आता उगवत आहे. मागील पाच वर्षांमध्ये या पक्षाने भरती सुरू केली होती. आता त्याच पक्षाला उतरती कळा सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. खडसेंप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे अजून काही दिग्गज नेते पक्षांतर करतील, कारण ते भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत आणि हे नेते आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे निर्णय घेऊन इतर पक्षांमध्ये जातील. पंकजा मुंडेंच नव्हे तर शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. मग त्या पंकजा मुंडे असो किंवा इतर कोणी जे कोणी येईल त्यांचे पक्षामध्ये स्वागतच आहे, असेही खोतकर म्हणाले.

अर्जुन खोतकर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, सकाळपासूनच फडणवीस यांनी खडसेंबद्दलचे मौन पाळलेले होते. त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले.

Last Updated : Oct 21, 2020, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.