ETV Bharat / state

जालन्यात शिवजयंती मिरवणूक उत्साहात

जालना शहरात मंगळवारी सर्वपक्षीय शिवजयंती उत्सवाला संध्याकाळी ५ वाजता सुरुवात झाली. मात्र, या उत्सवावर पुलवामा हल्ल्याचे सावट जाणवत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिवजयंती मिरवणूक
author img

By

Published : Feb 20, 2019, 9:25 AM IST

जालना - शहरात मंगळवारी सर्वपक्षीय शिवजयंती उत्सवाला संध्याकाळी ५ वाजता सुरुवात झाली. मात्र, या उत्सवावर पुलवामा हल्ल्याचे सावट जाणवत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवप्रतिमेचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.

जालन्यातील शिवजंयती

शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्यावतीने १९५६ पासून सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात येते. या समितीच्या माध्यमातून दरवर्षी तारखेनुसार शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येते. यावेळीही जुना जालन्यातील गांधीचमन येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे हार, तुरे, स्वागत समारंभाला फाटा देऊन मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी साध्या पद्धतीने लेझीम, ढोल पथक, यांच्या सहाय्याने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

लक्ष्मीकांत नगर येथे असलेल्या प्रयाग शाळेच्या चिमुकल्यांनी लेझीम सादर केली. तसेच महाविद्यालयीन युवतींनी शिवजयंतीचा उत्साह नृत्याच्या माध्यमातून मान्यवरांना दाखवून दिला. 'शिवगर्जना' या ढोल पथकानेही आपली कला सादर केली. घोडे, उंट, यांसारखे सजीव देखावेदेखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

मिरवणुकीपूर्वी झालेल्या छोटेखानी समारंभात सर्वपक्षीय शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, कार्याध्यक्ष रवी राऊत, अंकुश पाचफुले, सचिव अॅड. रवींद्र हुरे, कोषाध्यक्ष सतीश जाधव, यांच्यासह राजेश राऊत, भास्कर दानवे, रमेश देहेडकर, अंकुशराव राऊत, राजेंद्र राख, संजय लाखे, तहसीलदार बिपीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदर्गे, विजयकुमार पंडित, शितल तनपुरे, आयशा खान, रसना देहेडकर, आदींची उपस्थिती होती.

undefined

Intro:जालन्यात शिवजयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात मात्र दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव

Body:जालना शहरात सर्वपक्षीय शिवजयंती उत्सवाला पाच वाजता सुरुवात झाली .मात्र या उत्सवावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे सावट जाणवत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करून दिला.

Conclusion:श्री शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालन्याच्या वतीने 1956 पासून सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात येते. या समितीच्या माध्यमातून दरवर्षी तारखेनुसार शिवजयंतीनिमित्त छत्रपतींची भव्य मिरवणूक काढण्यात येते. आजही दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जुना जालन्यातील गांधीचमन येथून शिवजयंती च्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती .शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हार ,तुरे ,स्वागत समारंभाला फाटा मारून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. साध्या पद्धतीने लेझीम, ढोल पथक, यांच्या सहाय्याने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यानच्या काळात लक्ष्मीकांत नगर येथे असलेल्या प्रयाग शाळेच्या चिमुकल्यांनी लेझीम सादर केली. तसेच महाविद्यालयीन युवतींनी शिवजयंतीचा उत्साह नृत्याच्या माध्यमातून मान्यवरांना दाखवून दिला. शिवगर्जना या ढोल पथकाने ही आपली कला सादर केली. घोडे, उंट,सजीव देखावे हे देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
मिरवणुकी पूर्वी झालेल्या छोटेखानी समारंभात सर्वपक्षीय शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान कार्याध्यक्ष रवी राऊत ,अंकुश पाचफुले ,सचिव एडवोकेट रवींद्र हुरे,कोषाध्यक्ष सतीश जाधव, यांच्यासह राजेश राऊत, भास्कर दानवे ,रमेश देहेडकर ,अंकुशराव राऊत ,राजेंद्र राख, संजय लाखे, तहसीलदार बिपीन पाटील आदींची उपस्थिती होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदर्गे विजयकुमार पंडित शितल तनपुरे आयशा खान सौ रसना देहेडकर या महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.