जालना - राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उद्यापासून पुन्हा शाळा सुरू होणार आहेत. यावेळी शाळा निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांच्या कोरोना चाचणीसह, कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
निर्जंतुकीकरनावर 97 लक्ष 50 हजाराचा खर्च -
जालना जिल्हा परिषद अंतर्गत पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. या शाळांच्या निर्जंतुकीकरणावर शिक्षण विभागाने 97 लक्ष 50 हजार रुपये खर्च केले आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील 1532 शाळांना होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणेच खाजगी शाळांचेही निर्जंतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनाही याचा खर्च टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
जिल्ह्यात 1894 शाळा -
जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा असा ऐकून 1894 शाळा सुरू होणार आहेत. 1 लाख 49 हजार विद्यार्थी पाचवी ते आठवी या वर्गात शिक्षण घेत आहेत. तर त्यांना 12275 शिक्षक शिक्षण देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार नाही. मात्र, कोरोनाची ज्यांना लक्षणे आहेत, त्यांच्या तपासणीची काळजी घेतल्या जाणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यपालांच्या 'त्या' भूमिकेविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..