जालना - भोकरदन पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दानापूर परिसरात ट्रकवर टाकलेल्या छाप्यात सुगंधी चंदन आढळून आले. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी परराज्यातील दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या भोकरदन येथील दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ट्रकमध्ये भरलेल्या मालाविषयी माहिती घेतली. यावेळी त्यांना ही सुगंधी चंदनाची लाकडे असून त्याचे बाजार मूल्य १ लाख ४० हजार रुपये आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी या लाकडासह १८ लाखाचा बारा टायरच्या ट्रक जप्त केला आहे.