ETV Bharat / state

अपक्ष उमेदवार श्याम शिरसाट यांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

लोकसभा निवडणूकीसाठी संभाजी बिग्रेडने अपक्ष उमेदवार श्याम शिरसाट पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी बिग्रेडने पत्रकार परिषद घेत संभाजी बिग्रेड पुरस्कृत म्हणून शिरसाट पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील
author img

By

Published : Mar 26, 2019, 5:57 PM IST

जालना - लोकसभा निवडणूकीसाठी संभाजी बिग्रेडने अपक्ष उमेदवार श्याम शिरसाट पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी बिग्रेडने पत्रकार परिषद घेत संभाजी बिग्रेड पुरस्कृत म्हणून शिरसाट पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बिग्रेडने एैन शेवटच्या क्षणाला होय-नाही म्हणत पाठिंबा दिला.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील बोलताना

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील यांनी आज पत्रकार परिषद बोलावून संभाजी ब्रिगेडची लोकसभा उमेदवाराच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे संभाव्य उमेदवार श्याम रुस्तुमराव शिरसाट पाटील हेदेखील उपस्थित होते. मात्र, व्यासपीठावर श्याम पाटील यांच्या शिवाय इतर कुणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. यातच चंद पाटील यांनी पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली नाही आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा मात्र, सर्वच पत्रकारांनी चंद पाटील यांना धारेवर धरल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आपला निर्णय बदलला आणि वरिष्ठांनी आत्ताच आदेश दिले असून, संभाजी ब्रिगेड श्याम शिरसाट पाटील यांना संभाजी ब्रिगेडचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अपक्ष उमेदवार श्याम शिरसाट पाटील यांना संभाजी ब्रिगेडने पुरस्कृत केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे जिल्हा संघटक भगवान माने, विजय वाडेकर आदींची उपस्थिती होती.

Intro:संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद बोलावून ही शेवटच्या क्षणापर्यंत हो नाही करता करता शेवटी अपक्ष उमेदवार श्याम शिरसाठ यांना संभाजी ब्रिगेडचे पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे.

Body:संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील चंद यांनी आज पत्रकार परिषद बोलावून संभाजी ब्रिगेड ची लोकसभा उमेदवाराच्या बाबतीत पक्षची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे संभाव्य उमेदवार श्याम रुस्तुमराव शिरसाट पाटील हे देखील उपस्थित होते .मात्र व्यासपीठावर श्याम पाटील यांच्या शिवाय अन्य कोणीच पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे पत्रकारांनी त्यांना धारेवर धरले .त्यातच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद पाटील यांनीदेखील अद्याप पर्यंत पक्षाने स्पष्ट भूमिका सांगितली नाही आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच पत्रकारांनी धारेवर धरल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आपला निर्णय बदलला आणि वरिष्ठांनी आत्ताच आदेश दिले असून संभाजी ब्रिगेड शाम पाटील शिरसाट यांना संभाजी ब्रिगेडचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले .त्यामुळे आता अपक्ष उमेदवार श्याम पाटील शिरसाट यांना संभाजी ब्रिगेडने पुरस्कृत केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे जिल्हा संघटक भगवान माने विजय वाडेकर आदींची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.