ETV Bharat / state

Restoration of Idol of Shri Ram : जालन्यातील श्रीरामांच्या चोरी गेल्या मुर्तीची पुर्नरस्थापना ; भक्तगण आनंदात - जालन्यात श्रीरामांच्या मुर्तीची पुर्नरस्थापना

जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिर संस्थानमधील चोरी गेलेल्या पुरातन मूर्तीचा नुकताच शोध (Stolen Idol of Shri Ram at Jalna Jam Samarth) लागला. पोलिसांनी हुडकून काढलेल्या या पुरातन मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा काल पार पडला (Restoration of Idol of Shri Ram) आहे.

Restoration of Idol of Shri Ram
जालन्यातील श्रीरामांच्या चोरी गेल्या मुर्तीची पुर्नरस्थापना
author img

By

Published : Nov 26, 2022, 9:12 AM IST

जालना : जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिर संस्थानमधील चोरी गेलेल्या पुरातन मूर्तीचा नुकताच शोध (Stolen Idol of Shri Ram at Jalna Jam Samarth) लागला. पोलिसांनी शोधून काढलेल्या या पुरातन मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा काल पार पडला. या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी झाली (Restoration of Idol of Shri Ram) आहे. या भव्य सोहळ्याला संत, महंतांसह जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत.

जालना जाम समर्थ येथे श्रीरामांच्या चोरी गेल्या मुर्तीची पुर्नरस्थापना

मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा : श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या प्राचीन मूर्ती काही दिवसांपूर्वी चोरी गेल्या होत्या. त्यानंतर पोलीसांनी त्यानंतर पोलीसांनी कसून तपास करीत चोरट्यांना ताब्यात घेतले. शिवाय पुरातन मूर्तीचा शोध लावला. सर्व मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा सुरू झाला आहे. या सोहळ्यास गुजरातमधील श्रीमत् शंकराचार्य द्वारकापीठ तथा धर्मसभा विद्वत्संघाचे अध्यक्ष ब्रम्हचारी निरंजनानंद, वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री, श्रीराम मंदिराचे श्री रामदास महाराज आचार्य, अशा संत महात्म्यांची उपस्थिती होती. याचबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जिल्ह्यातील नेते मंडळींची उपस्थित (Restoration of Stolen Idol of Shri Ram) होती.

कृतज्ञता सोहळा : आज सकाळी घनसावंगी पोलिस ठाण्यापासून सजवलेल्या वाहनातून मूर्ती कुंभार पिंपळगाव येथून पायी दिंडी मिरवणुकीसह मूर्ती जांबसमर्थकडे रवाना झाल्या. या मुर्त्या गावात पोहचताच जांबसमर्थ गावातून देखील मूर्तीची मिरवणुक काढण्यात आली. दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान मूर्तीचे मंदिरात आगमन झाले, त्यानंतर महाआरती झाली. या वेळेत कृतज्ञता सोहळा तसेच सत्कार समारंभ देखील झाला. या सोहळ्यात पोलिस प्रशासनाचे पत्रकारांचा व ज्यांनी ज्यांनी मुर्ती चोरीनंतर या प्रशासनावर दबाव आणला, व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मुर्ती शोध घेण्यासाठी मदत केली. त्या सर्वांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच माजी मंत्री राजेश टोपे यांनी देखिल आपल्या भावना व्यक्त (Idol of Shri Ram) केल्या.

उत्सवाची सांगता : आज शनिवारी सकाळी सहा वाजता मूर्तीस महाभिषेक, महापूजेसह विविध धार्मिक विधी होतील. सकाळी साडेसात दरम्यान पुनर्स्थापना विधी मुहूर्त आणि महाआरती झाली. सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्री मारुतीस रुद्राभिषेक तर सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान पवमान स्वाहाकार आणि पूर्णाहुती व त्यानंतर आरती होईल. दुपारी साडेबाराला महाप्रसादाचा कार्यक्रम तर संध्याकाळी सहाला सांप्रदायिक उपासना त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते आरती होऊन रात्री सात वाजता उत्सवाची सांगता (Stolen Idol of Shri Ram) होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.