बदनापूर (जालना) - तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. सोडत पद्धतीने हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत संपली होती.
बदनापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्देश देऊन निवडणूक कार्यक्रम व आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी तहसीलदार छाया पवार, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नायब तहसीलदार शेख फारूकी यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आरक्षण सोडत ऐकण्यासाठी तहसील परिसरात संबंधित गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी गावकऱ्यांसाठी कोरोना नियमाचे पालन करत मंडप टाकून तहसीलच्यावतीने व्यवस्था करण्यात आलेली होती. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 ग्रामपंचायत त्यापैकी महिला प्रवर्गासाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 त्यापैकी महिला 11, सर्वसाधारण 45 त्यापैकी महिलांसाठी 23 गावांचे सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - सीएमपी प्रणालीत जालना जि.प.चा बोलबाला; प्रशिक्षणासाठी आले नंदुरबारहून अधिकारी
हेही वाचा - तीर्थपुरीच्या बारा एकर जागेवर साकारले जाते आहे भव्य 'क्रीडासंकुल'