जालना - लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर भावकीतील नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावातील ही घटना घडली आहे. आरोपी विरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार हा फरार आहे.
गुन्हा दाखल, आरोपी फरार - भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावात रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घराबाहेर लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर 35 वर्षीय आरोपी व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी समाधान दगडून पाळोदे यांच्या विरुद्ध बळजबरी करून बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला असून आरोपीला पकडण्यासाठी हसनाबाद पोलिसांनी पथक तैनात केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे करीत आहेत.
हेही वाचा - IPS Ramya Rides Bicycle In Midnight : मध्यरात्री सायकलवरून महिला आयपीएसने घेतला शहराचा आढावा