जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी रेशन व आरोग्य सेवा सुरळीत पार पाडण्यासंबंधी माहिती घेतली; आणि सूचना देखील दिल्या.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, नगर पंचायतचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून लॉकडाऊन दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहाणी करण्यात आली. येणाऱ्या महिन्यांमधील विविध सण व उत्सव नागरिकांनी घरातच साजरे करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने राज्यात अन्नधान्याचा पुरवठा केला असून राज्य शासनाने देखील तीन महिन्यांचे रेशन एकत्रित वाटावे, असे मागणी त्यांनी केली.