ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - आत्मनिर्भर बनवण्यासाठी कारागृहात कैद्यांना दिले जात आहे प्रशिक्षण - Jalna District Latest News

जालन्यातील कारागृहामध्ये कैद्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कैद्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना झाडू व खराटे बनवण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर बनवण्यासाठी कारागृहात कैद्यांना दिले जात आहे प्रशिक्षण

author img

By

Published : Jan 29, 2021, 4:38 PM IST

जालना- गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना केवळ शिक्षाच देणे हा उद्देश नसतो, तर त्यांना केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप व्हावा आणि पुन्हा ते या मार्गाकडे वळू नयेत, म्हणून दिलेली ती शिक्षा असते. या शिक्षेनंतर समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वाईट असतो. त्यामुळे कारागृहातून बाहेर आलेला कैदी सक्षम आणि आत्मनिर्भर बनवा म्हणून कमी कालावधीचेचे व्यवसाय प्रशिक्षण त्याला दिले जाते. अशाप्रकारचे झाडू आणि खराटे बनवण्याचे प्रशिक्षण जालना येथील कारागृहात दिल्या जात आहे. त्यासोबत कैदी आहे म्हणून त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, तो आरोग्याच्या दृष्टीने सक्षम राहावा म्हणून जालना येथील कारागृहात या कैद्यांसाठी पिण्यासाठी स्वच्छ वॉटर प्युरिफायरचे पाणी, आणि अंघोळीसाठी गरम पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षा भोगत असलेला कैदी, आणि त्याच्या वाट्याला आलेल्या प्रचंड हालअपेष्टा, तुरुंगात होणारा त्याचा छळ असे सर्वसामान्यपणे चित्रपटात कारागृहाचे चित्र असते, मात्र आता कारागृहाचे हे चित्र बदत आहे. कैद्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो स्व:ताच्या पायावर उभा राहावा, त्याला उपजिवीकेचे साधन मिळावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये कैद्यांना झाडू आणि खराटे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न

या सुधारणा आणि पुनर्वसन केंद्रामध्ये कैद्याला जामीन मिळेपर्यंत ठेवण्यात येते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर हे अवलंबून आहे. न्यायालय कधी येथील कैद्यांना जामीन मंजूर करेल किंवा किती दिवस शिक्षा देईल हे येथील कारागृह अधीक्षकांच्या हातात नसते. त्यामुळे अल्पावधीचे झाडू आणि खराटे बनवण्याचे प्रशिक्षण येथे दिले जाते. जेणेकरून शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला कारागृहाच्या बाहेर गेल्यानंतर देखील सन्मानाने आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करता येऊ शकेल.

आत्मनिर्भर बनवण्यासाठी कारागृहात कैद्यांना दिले जात आहे प्रशिक्षण

कारागृहाची क्षमता

जालन्यापासून जवळच असलेल्या इदेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे कारागृह आहे. 556 कैदी राहू शकतात एवढी या कारागृहाची क्षमता आहे. परंतु सध्या या कारागृहामध्ये 232 कैदी आहेत, त्यापैकी अठरा महिला आहेत. महिनाभरापूर्वी प्रत्येकी 7 लाख रुपये खर्च करून, येथील कैद्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी व अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.