ETV Bharat / state

जालना : गोळीबार प्रकरणातील आरोपींसह पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी - जालना बातमी

भीमराज प्रवेशद्वाराजवळ 23 जुलैला सायंकाळी गोळीबार झाला होता. या प्रकरणातील चार आरोपींना सोबत घेत घटनास्ठळासह अन्य दोन ठिकाणांची पाहणी केली आहे.

jalna police
आरोपींसह पाहणी करताना पोलीस
author img

By

Published : Aug 23, 2020, 9:30 PM IST

Updated : Aug 23, 2020, 10:31 PM IST

जालना - शहरात नूतन वसाहत भागात भीमराज प्रवेशद्वाराजवळ 23 जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. या प्रकरणातील मुख्य दोन आरोपींसह इतर दोन आरोपींना घेऊन पोलिसांनी आज (दि. 23 ऑगस्ट) घटनास्थळाची आणि अन्य दोन ठिकाणांची पाहणी केली.

आरोपींसह पाहणी करताना पोलीस पथक

वाळू व्यवसायातून 23 जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नूतन वसाहत येथील भीमराज प्रवेशद्वाराच्या बाजूला गोळीबार झाला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बारा मुख्य आरोपींसह अन्य पंचवीस ते तीस आरोपींविरुद्ध 24 जुलैला पहाटे तीन वाजता गुन्हा नोंदविला होता.

दरम्यान, तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे सरकारच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर 13 आरोपींना अटकही करण्यात आली होती. आज (23 ऑगस्ट) आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलिसांनी माऊली मेंगडे, मच्छिंद्र ढगे या दोन मुख्य आरोपींसह विशाल आगळे, निलेश गोरडे, अशा चौगांना घेऊन भीमराज प्रवेशद्वाराची पाहणी केली.

यावेळी नूतन वसाहत परिसरामध्ये बघ्यांची गर्दी होती. मात्र, वातावरणही तणावपूर्ण होते. त्यानंतरआरोपींनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी इंदेवाडी परिसरात पेट्रोल पंपासमोर व मागे पाण्याच्या टाकीजवळील दोन इमारतींची पाहणी केली. यामधील साईकृपा या इमारतीमध्ये विशाल आगळे हा राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या चारही आरोपींना घेऊन पोलीस तपास करत आहेत. आजच्या या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक पोवार यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - नगर विकास खात्याकडून 8 महिन्यात एक दमडीही मिळाली नाही : काँग्रेस आमदार

Last Updated : Aug 23, 2020, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.