ETV Bharat / state

टाळेबंदी वाढणार असल्याची अफवा महागात; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरत धार्मिक उत्सवाबाबत समाज माध्यमातून अफवा पसरविल्याचा दोघांवर आरोप आहे. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 प्रमाणे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जालना पोलीस
जालना पोलीस
author img

By

Published : Jul 28, 2020, 7:22 PM IST

जालना – अफवा पसरविणे हा गुन्हा असताना त्याकडे दुर्लक्ष करणे जालना शहरातील दोघांना चांगले महागात पडले आहे. शहरात टाळेबंदी वाढणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलाल सय्यद आणि मोईज अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत.

बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी राज्य सरकारतर्फे आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले की, 27 जुलैला रात्री फेसबुक अकाउंट पाहत होतो. तेव्हा बिलाल सय्यद, आणि मोईज अन्सारी या दोघांनी जिल्हाधिकारींविरोधात एकेरी भाषेत अपशब्द वापरल्याचे दिसले. तसेच पुन्हा एकदा टाळेबंदी वाढविण्यात येणार असल्याची त्यांनी अफवा पसरवली आहे.

कुठल्याही परिस्थितीत बकरी ईद सण साजरा करायचा आहे. त्यासाठी काहीही काम पडले तरी करावे लागेल, असे म्हणत मुस्लिम बांधवाच्या भावना भडकाविण्याचा आरोपींना प्रयत्न केला. सध्या कोरोनाच्या काळामध्ये जनता भयभीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेली संचारबंदी आणि जमावबंदीचा आदेश त्यांनी डावलला. तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये भावना भडकविण्याचे आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात अफवा पसरविण्याचे कृत्य केले. त्यामुळे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 प्रमाणे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमात टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणात सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.