ETV Bharat / state

रमजानमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच करू, मुस्लीम धर्मगुरूचे आश्वासन - रमजानमधील धार्मिक कार्यक्रम

दररोज मशीदीमध्ये एकत्रित येऊन तराबी नमाजच्या माध्यमातून नमाज अदा केली जाते. परंतु, सध्या कोरोना रोगाचे संकट आले आहे. या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवानी घरातच रोजा इफ्तार करावा आणि तराबी नमाज देखील घरात पठण करून प्रशासनास सहकार्य करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मौलानाकडून करण्यात आले आहे.

ramjan  badnapur jalna news  रमजानमधील धार्मिक कार्यक्रम  जालना कोरोना अपडेट
रमजानमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच करू, मुस्लीम धर्मगुरूचे आश्वासन
author img

By

Published : Apr 22, 2020, 4:16 PM IST

जालना - मुस्लीम बांधवासाठी रमजान सण हा अंत्यत महत्वाचा असून या महिन्यात मुस्लीम बांधव एकत्र येतात आणि नमाज पठण करतात. परंतु, सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रमजान महिन्यातील तराबी नमाज 'कोविड १९' परिपत्रकानुसार प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन बदनापूरचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी केले आहे.

सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासन विविध उपाययोजना आखत असून गर्दी न करणे हा उपाययोजनेमधील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या आदेशाने जमावबंधी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुस्लीम बांधवांचा रमजान महिना २५ एप्रिल पासून सुरू होत आहे. दक्षता म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी मुस्लीम धर्मगुरूंची बैठक घेण्याचे आदेश जालना जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना दिले. त्यानुसार बदनापूर पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली बदनापूर शहरासह तालुक्यातील मुस्लीम धर्मगुरूंची बैठक बदनापूर पोलीस ठाण्यात २२ एप्रिलला घेतली. या बैठकीत अंतर राखून सर्वांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

मुस्लीम धर्मगुरूंना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक मारोती खेडकर म्हणाले की, रमजान महिन्यात माईकमधून अजान देता येईल. तसेच नमाज पठाण देखील माईकद्वारे करता येईल. परंतु, रोज इफ्तारसाठी जमाव करू नये व 'कोविड १९'च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्वांनी घरातच नमाज पठण करावे. तसेच देवाची भक्ती करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या बैठकीस मौलाना अय्युब, मौलाना महेमूद, मौलाना नसीर, मौलाना अख्तर, मौलाना रशीद, मौलाना जावेद, मौलाना अलीम, मौलाना मुफीद, मौलाना अतिक, मौलाना इब्राहिम, मौलाना हारून आदी उपस्थित होते.

२५ एप्रिल पासून मुस्लीम समाजात अंत्यत महत्वाचा समजला जाणारा रमजान महिना सुरू होत असून या महिन्यात उपास ठेवले जातात. तसेच दररोज मशीदीमध्ये एकत्रित येऊन तराबी नमाजच्या माध्यमातून नमाज अदा केली जाते. परंतु, सध्या कोरोना रोगाचे संकट आले आहे. या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवानी घरातच रोजा इफ्तार करावा आणि तराबी नमाज देखील घरात पठण करून प्रशासनास सहकार्य करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.