ETV Bharat / state

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जालन्यात संचारबंदीची एैशीतैशी - jalna corona updates

जालना जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वरुडी चेक पोस्टवर ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्रीकरण करण्यात आले. त्यामध्ये बँक कर्मचारी, शासकीय अधिकारी हे औरंगाबाद येथून जालन्यात ये-जा करणाऱ्यांमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळाले. यांना देण्यात आलेले पास कालबाह्य झाले आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जालन्यात संचारबंदीची एैशीतैशी

author img

By

Published : Apr 27, 2020, 5:59 PM IST

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन रुग्ण होते. या दोन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जालना जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र, बुलडाणा आणि औरंगाबाद हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत आणि या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यभागी जालना जिल्हा आहे. त्यामुळे औरंगाबादहून जालना - बुलडाण्याहून जालन्यात येणारे-जाणारे अनेक कर्मचारी, व्यापारी, अधिकारी आहेत. पर्यायाने या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे असेच जाणे-येणे चालू राहिले तर जालना जिल्हा रेडझोनमध्ये येण्यास वेळ लागणार नाही.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जालन्यात संचारबंदीची एैशीतैशी

आज सोमवारी सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान औरंगाबादहून जालन्यामध्ये येणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय होती. जालना जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वरुडी चेक पोस्टवर ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्रीकरण करण्यात आले. त्यामध्ये बँक कर्मचारी, शासकीय अधिकारी हे औरंगाबाद येथून जालन्यात ये-जा करणाऱ्यांमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळाले. यांना देण्यात आलेले पास कालबाह्य झाले आहेत. मात्र, ओळखपत्र दाखवून आजही हे कर्मचारी जालन्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर आरोग्य विभागाचे कर्मचारीदेखील मागे राहिले नाहीत.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद येथून ये-जा करणाऱ्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, आता या बँक अधिकाऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कोण आळा घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज या चेकपोस्टवर तपासणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवलिंग बहुरे यांच्यासह आरोग्य सेवक एमआर खेडकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. चेकपोस्टवरून जालना शहरात येण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्यामध्ये काही वाहनांमध्ये औरंगाबाद येथून दोन चेक पोस्ट पर्यंत येतात आणि चालक त्यापैकी एकाला सोडून गाडी परत नेतो. त्याचवेळी चेक पोस्टच्या दुसऱ्या बाजूला हा प्रवासी चालत येतो आणि दुसरा गाडीमध्ये बसून जालन्यात येतो, असा अनागोंदी कारभार सुरू आहे.

चेक पोस्टच्या पुढे औरंगाबादकडे गेल्यानंतर वाकुळणी एक फाटा आहे. या फाट्यावरून काही वाहने वाकुळणीमार्गे बदनापूर येऊन जालना शहरात येत आहेत. त्यामुळे जालना जिल्हा आज जरी ग्रीन झोन मध्ये असला तरी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कठोर भूमिका घेत जालना जिल्ह्याला कोरोनापासून मुक्त केले आहे. आता कठोर भूमिका घेतली नाही तर काही दिवसातच जालना जिल्ह्याला पुन्हा कोरोना घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस प्रशासनाने ये-जा करणाऱ्या सुमारे तीनशे जणांचे पास रद्द केले आहेत असे असताना हे अधिकारी, कर्मचारी कोणत्या पासच्या आधारे जालन्यात येतात हे तपासणेदेखील आता महत्त्वाचे ठरले आहे. बँक अधिकाऱ्यांना सूट आणि सामान्य जनतेला वेठीस धरणे हा प्रकार आता जनतेच्या जिव्हारी लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.