जालना - दिल्लीमध्ये गेल्या 70 दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन भरकटत आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
मागील 70 वर्षाचा निष्कर्ष
गेल्या 70 वर्षांपासून आणि मागील वीस वर्षाच्या काळात जे सरकार सत्तेवर आली होती, त्या सर्वांचा सारांश घेऊन हे कायदे तयार केले आहेत. सुरुवातीला एमएसपीच्या विषयावर मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांना जमा करण्यात आले. त्यावेळी हमीभावावरून हा विषय तीन कायद्यावर गेला . त्यामुळे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली गेली. आता हमीभाव सोडा आणि तीन कायदे रद्द करा अशी मागणी सुरू झाली, त्यापैकी काही सूचनांवर चर्चा करण्याचीही सरकारने तयारी दर्शवली. मात्र, ते देखील शेतकरी ऐकायला तयार नाहीत. तसेच तिन्ही कायदे 18 महिन्यांसाठी निलंबित करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यावरही त्यांचे समाधान होत नाही. शेतकऱ्यांचे भले करणारे हे कायदे आहेत. हे कायदे रद्द केल्याने जर शेतकऱ्यांचे भले होत असेल तर आमचा देखील त्यांना पाठिंबा असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.