ETV Bharat / state

accident Jalna Samrudhi Highway : जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जण ठार

समृध्दी महामार्ग ( accident Prosperity Highway) वाहतुकीसाठी खुला झाला नसला तरी नागरिक त्यावरून भरधाव वाहने नेत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि.१२) दुपारी चार वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात एक भरधाव कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात एकजण ठार ( One died in an accident) झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

Terrible accident on Jalna Samrudhi Highway
जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Jun 13, 2022, 1:32 PM IST

जालना - समृध्दी महामार्ग ( accident Prosperity Highway) वाहतुकीसाठी खुला झाला नसला तरी नागरिक त्यावरून भरधाव वाहने नेत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि.१२) दुपारी चार वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात एक भरधाव कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात एकजण ठार ( One died in an accident on Jalna Samrudhi Highway ) झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी ( Both seriously injured ) झाले. बळीराम सखाराम खोकले (४५, रा. मेहकर, जि.बुलडाणा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर येथील बळीराम खोकले, (४५) चंद्रकांत सीताराम साबळे, (४३) सुनील श्रीराम लिंबेकर (४५) हे कारने (क्र. एमएच २८, बीके ३१००) औरंगाबादहून मेहकरकडे जात होते.

तांदुळवाडी शिवारात रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात कारमधील बळीराम खोकले यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे सहायक निरीक्षक साळवे, कर्मचारी एस.बी. उबाळे, के.एम. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut PC : 'भुयार यांच्या बोलण्यात मला खरे पणा दिसला', देवेंद्र भुयारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचा - Siddhu Moose Wala Murder Case : शार्पशूटर संतोष जाधवच्या पुणे पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या, न्यायालयाने 20 जूनपर्यंत ठोठावली कोठडी

हेही वाचा - lalu IN Presidential Election : लालू प्रसाद यादव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.