ETV Bharat / state

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या - crime news

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली. ही घटना भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

Newlyweds commit suicide
नवविवाहितेची आत्महत्या
author img

By

Published : Nov 1, 2020, 11:31 AM IST

जालना - विषारी औषधी घेतल्याने नवविवाहिता पूजा लोणकर (२०) यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे घडली. या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील पूजा हिचा विवाह ९ जून २०२० रोजी तडेगाव येथील पवन संजय लोणकर यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच सासरचे लोक हुंड्यासाठी पूजाचा छळ करू लागले. या छळाला कंटाळून पूजा माहेरी गेली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी आता छळ करणार नाही, असे सांगून सासरच्यांनी तिला परत नेले.

मात्र, २७ ऑक्टोबर रोजी पूजाने सासरची मंडळी पुन्हा छळ करत असल्याचे आईला फोन करून सांगितले. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी रात्री तिने विष घेतले. तिला उपचारासाठी आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सासरच्या लोकांनी तिच्यावर सिल्लोड येथे उपचार करू, असे म्हणत डिस्चार्ज घेतला. त्यानंतर तिला माहेरी सोडून तडेगावला गेले.

भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

३० ऑक्टोबर रोजी पहाटे पूजाची तब्येत बिघडल्याने तिला सिल्लोडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अशी तक्रार रंजना समाधान राऊत (रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात दिली. यावरून पती पवन लोणकर, सासू वंदनाबाई संजय लोणकर, सासरा संजय धोंडिबा लोणकर, दीर जीवन संजय लोणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा- इंग्लंडमध्ये पुन्हा 'लॉकडाऊन'...कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची घोषणा

हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाची परिस्थिती...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.