ETV Bharat / bharat

मराठी माणसावरील हल्ले ही भाजपाच्या अंताची सुरुवात-संजय राऊत - SANJAY RAUT NEWS

कल्याणमधील मराठी कुटुंबावर परप्रांतीयानं हल्ला केल्यामुळे शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी महायुती सरकावर निशाणा साधला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut News
मराठी माणसाच्या प्रश्नावरून संजय राऊत आक्रमक (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

नवी दिल्ली- कल्याणमधील मराठी कुटुंबावर परप्रांतीय असलेल्या सरकारी अधिकाऱ्यानं हल्ला केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेतील (एकनाथ शिंदे) नेते हे नामर्द आहेत, असा घणाघात केला.

खासदार संजय राऊत म्हणाले, " मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत. ठाणे, डोंबिवलीत मराठी माणूस घालविण्याचे प्रयत्न दिले आहेत. अमित शाह यांनी ज्यांच्याकडे शिवसेना सोपविली आहे, ते नामर्द लोक आहेत. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान केले. मराठी माणसाला दुय्यम करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली. कालचा कल्याणमधील हल्ल्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. दोन्ही मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मराठी माणूस म्हणून घेताना यांना लाज वाटली पाहिजे. आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे १०० बाप खाली यावे लागतील. मराठी माणसावरील हल्ले ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचा कट आहे. बाहेरून आलेल्यांना आम्ही स्वीकारतो. मांसाहार करणाऱ्यांवर हल्ला केला. मांस खाणे हा गुन्हा आहे का?".

  • भाजपा युवा मोर्चात्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला केला. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " ही सत्तेची मस्ती आहे. अशी मस्ती आणि हुकूमशाही नष्ट होते, अशी इतिहासात दाखले आहेत. आमच्यावर टीका करण्यापूर्वी अवतीभोवती असणाऱ्यांना भ्रष्टाचारांचा बंदोबस्त करा".

खासदार सारंगी नौटंकी करण्यात पटाईत- संसदेतील राहुल गांधींचा कथित धक्का लागल्यामुळे खासदार सारंगी जखमी झाले आहेत. या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावर खासदार राऊत यांनी भाजपा म्हणजे नाटकशाळा असल्याची टीका केली. ते म्हणाले, "भाजपा म्हणजे नटरंगी आहे. नौटंकी करण्यात खासदार सारंगी पटाईत आहेत. त्यांना ओळखत असून नौटंकी करण्यात ते १ नंबर आहेत. भाजपाची नाटक बंद होणार आहेत".

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत विघातक शक्ती सामील झाल्याचा विधिमंडळाच्या अधिवेशनात आरोप केला. त्यावर खासदार राऊतांनी भारत जोडोला गेलेले आढाव, राऊत हे नक्षलवादी आहेत का? असा सवाल केला.
  • बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, " बीडमधील आरोपीला वाचविणारे बाहुबली मंत्रिमंडळात आहेत. जितेंद्र आव्हाड आणि धस आरोपीला अटकेची मागणी करत आहेत".

हेही वाचा-

  1. एकनाथ शिंदेंसह अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही, याची शंका- संजय राऊत
  2. 'आता किती आदळआपट केली, तरी हाती खुळखुळाच' ; संजय राऊतांचा नाराज छगन भुजबळ, मुनगंटीवारांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.