नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बीडचे सरंपच संतोष देशमुख आणि परभणीमधील हिंसाचाराची घटना यावरून विरोधकांनी कारवाईची सरकारकडं मागणी केली आहे. दोन्ही मुद्द्यांबाबत विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार आहेत.
Live Updates
- कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाल्याचे विधानपरिषदेत पडसाद उमटले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " माजोरड्यांचा माज उतरल्याशिवार राहणार नाही. मराठी माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात भेदभाव झाला? शाकाहार केल्यानं भेदभाव करणे चूक आहे. मुंबई, परिसर, महाराष्ट्र हा मराठी माणसाचच आहे. खाण्याच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. रॉड मारल्यानं ३०७ चा गुन्हादेखील दाखल होईल. पोलीस कारवाई करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला तात्काळ निलंबित करण्यात येत आहे"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण गंभीर आहे. कंत्राट मिळविण्यासाठी खंडणी मागण्यात आली. आरोपी मारहाण करत असल्याची तक्रार संतोष देशमुख यांच्याकडं करण्यात आली होती. देशमुखांच्या हत्येची पाळेमुळे खोदण्यात येणार आहे. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था हे चित्र बदलले पाहिजे. घुले वगैरे दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता".
- परभणीतील जाळपोळ प्रकरणावरून पोलिसांनी ५१ जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मनोरुग्ण आहे की तपासण्यासाठी डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. आरोपी खरेच माथेफिरू आहे का, हे तपासण्यात येणार आहे. जमावानं कार फोडल्या होत्या. तसेच रास्ता रोको केला होता.
- विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, " मराठी माणसाला घर दिले नाही तर इमारतीची ओसी रद्द करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मराठी माणसाला घर नाकारण्यांवर गुन्हा दाखल करा. मराठी-अमराठी वादाला भाजपा जबाबदार आहे. मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही".
- सभागृहात फलक, पोस्टर्स आणि दैवतांचे फोटो लावण्याची परवानगी नाही. त्यामुळे विरोधकांनी डेस्कवर लावलेले चित्र काढावेत, अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. अजित पवार यांनी बाबाबासाहेब आमचेदेखील आहेत. आमच्या येथेही फोटो लावावेत, असं म्हटलं आहे. बाबासाहेबांचा फोटो बाकावर लावण्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ सुरू आहे. सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं आहे.
- विधानभवन परिसरात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीचा यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध खेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा विरोधकांनी आरोप केला.
- विधिमंडळात भाजपाचे आमदार राहुल गांधीविरोधात आक्रमक झाले आहेत.
- "राहुल गांधींनी कुणालाही धक्का मारला नाही. राहुल गांधींना टार्गेट केले जात आहे. बाबासाहेबांचा अपमान लपविण्यासाठी फेक नेरिटव्ह केले जात आहेत," असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. त्यावर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
- मुंबई काँग्रेस कार्यालयावर भाजपानं भ्याड हल्ला केल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक होणार आहेत. या हल्ल्याप्रकरणावर विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवमान प्रकरणी काँग्रेसनं राज्यात शांतपणे आंदोलन केलं. पण, त्याला उत्तर म्हणून भाजप युवा मोर्चानं काँग्रेसच्या मुंबई कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
- आमदार सुरेश धस यांनी पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, " तत्कालीन कृषीमंत्र्यांनी पीकविमा योजनेचा गैरफायदा घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पीकविमा घोटाळा समोर येत आहे. शेकडे शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहे".
- बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. बीड आणि परभणी प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी केली आहे.
हेही वाचा-